शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक झटका! राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावल्यानंतर दिल्लीतील बंगला सोडावा लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2023 12:14 IST

राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाल्यानंतर आम आदमी पक्ष लवकरच दिल्लीतील पक्ष कार्यालयासाठी जमीनीची मागणी करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

दोन दिवसापूर्वी निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांच्या स्थितीबाबत नवीन अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा काढून घेण्यात आला आहे.  निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आता सरकारही कारवाईच्या तयारीत आहे. केंद्र सरकार सीपीआय आणि राष्ट्रवादी काँग्रेसला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावल्यानंतर त्यांना दिलेले बंगले रिकामे करण्याचे निर्देश देऊ शकते. याशिवाय, तृणमूल काँग्रेसही जमीन गमावू शकते.

राहुल गांधी ‘मातोश्री’वर जाणार? लवकरच उद्धव ठाकरेंना भेटण्याची शक्यता; चर्चांना उधाण

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयासाठी नवी दिल्लीत अजूनही जागा निश्चित केलेले नाही. दीनदयाल उपाध्याय मार्गावर टीएमसीला १,००८ चौरस मीटर जमीन देण्यात आली होती. मात्र, या पक्षाने दोन मंदिरांच्या अतिक्रमणाचा हवाला देत आक्षेप घेतला. जागा वाटप होऊन नऊ वर्षे उलटून गेल्यानंतरही टीएमसीने या जागेचा ताबा घेतलेला नाही.

जर टीएमसीने जमीन ताब्यात घेतली असती, तर राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावूनही ते कार्यालय बांधू शकले असते. आता टीएमसीला ही जमीन मिळण्याची शक्यता कमी आहे, असंही बोललं जात आहे. 

सीपीआय त्यांचे केंद्रीय कार्यालय अजॉय भवन, कोटला मार्ग येथे ठेवेल, पण पुराण किला रोडवरील टाइप-VII बंगला रिकामा करावा लागेल. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीला पक्ष कार्यालयासाठी देण्यात आलेला १, कॅनिंग रोडचा बंगला रिकामा करावा लागणार आहे.

राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाल्यानंतर आम आदमी पक्ष लवकरच दिल्लीतील पक्ष कार्यालयासाठी जमीन वाटपाची मागणी करणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे.

राजकीय पक्षांना जमीन देण्याच्या धोरणानुसार आम आदमी पक्षाला ५०० चौरस मीटरचा भूखंड मिळू शकतो. आपचे संसदेच्या दोन्ही सभागृहात १५ पेक्षा कमी खासदार आहेत.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसdelhiदिल्लीSharad Pawarशरद पवार