शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नायब सिंह सैनी यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ; मनोहर लाल यांच्या पाया पडून घेतले आशीर्वाद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2024 18:29 IST

Nayab Singh Saini : शपथ घेण्यापूर्वी नायब सिंह सैनी यांनी मनोहर लाल यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले. 

Haryana CM Nayab Singh Saini :  चंडीगड: लोकसभा निवडणुकीपूर्वी हरियाणातील जनतेला नवा मुख्यमंत्री मिळाला आहे. मंगळवारी संध्याकाळी राजभवनात झालेल्या शपथविधी सोहळ्यात भाजपा प्रदेशाध्यक्ष नायब सिंह सैनी यांनी हरियाणाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांनी नायब सिंह सैनी यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्याशिवाय एकूण पाच मंत्र्यांनीही शपथ घेतली. शपथ घेण्यापूर्वी नायब सिंह सैनी यांनी मनोहर लाल यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले. 

नायब सिंह सैनी हे ओबीसी प्रवर्गातील असून ते कुरुक्षेत्रचे खासदार आहेत. दरम्यान, जेजेपीसोबतची लोकसभा जागा वाटपाची बोलणी फिस्कटताच आज भाजपाच्या हरियाणा सरकारने राजीनामा दिला होता. यानंतर अपक्षांच्या मदतीने पुन्हा भाजपाने सरकार स्थापन केले असून मनोहर लाल खट्टर यांच्या नेतृत्वात बदल करण्यात आला आहे. आज झालेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मुख्यमंत्री पदासाठी नायब सिंह सैनी यांच्या नावाला पाठिंबा देण्यात आला होता. 

'या' नेत्यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ!राजभवनात झालेल्या शपथविधी सोहळ्यात कंवर पाल गुर्जर यांनीही मंत्रीपद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. कंवर पाल गुर्जर हे मनोहर लाल खट्टर सरकारमध्ये शिक्षणमंत्री होते. मूळचंद शर्मा यांनाही कॅबिनेट मंत्री करण्यात आले आहे. मूलचंद शर्मा यांनीही राजभवनात मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत अपक्ष आमदार रणजित सिंह हेही कॅबिनेट मंत्री झाले आहेत. जयप्रकाश दलाल आणि डॉ. बनवारी लाल यांनीही हरियाणाचे मंत्री म्हणून शपथ घेतली.

अनिल विज शपथविधीला उपस्थित राहिले नाहीतदरम्यान, शपथविधी सोहळ्यादरम्यान अनिल विज हे उपस्थित नव्हते. आज झालेल्या भाजपा विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नायब सिंह सैनी यांच्या नावावर अनिल विज खूश नव्हते. या कारणास्तव त्यांनी बैठक सोडली, असे जाणकारांचे म्हणणे आहे. बैठकीनंतर अनिल विज हे सरकारी वाहन आणि ताफा सोडून खासगी वाहनाने अंबाला येथील आपल्या घरी गेले. यादरम्यान त्यांनी अंबाला येथून दप्पड टोल प्लाझा येथे आपली कार मागवली आणि नंतर स्वत: चालवत घरी निघून गेले. 

टॅग्स :HaryanaहरयाणाBJPभाजपा