नक्षलवाद्यांनी हल्ला केल्यास सडेतोड उत्तर देऊ - राजनाथ सिंह
By Admin | Updated: June 27, 2014 15:17 IST2014-06-27T15:17:15+5:302014-06-27T15:17:39+5:30
निष्पापांचा जीव घेणा-या नक्षलवाद्यांशी कोणतीही चर्चा होऊ शकत नाही, मात्र नक्षलवाद्यांनी हल्ले केल्यास सडेतोड उत्तर देऊ, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी ठणकावले

नक्षलवाद्यांनी हल्ला केल्यास सडेतोड उत्तर देऊ - राजनाथ सिंह
ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. २७ - निष्पापांचा जीव घेणा-या नक्षलवाद्यांशी कोणतीही चर्चा होऊ शकत नाही, मात्र नक्षलवाद्यांनी हल्ले केल्यास सडेतोड उत्तर देऊ, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी ठणकावले. नक्षलग्रस्त प्रभावित राज्यातील वरिष्ठ अधिका-यांशी झालेल्या बैठकीत गृहमंत्र्यांनी नक्षलवाद्यांविरोधात कडक पावले उचलण्याचा संदेश दिला. ते म्हणाले नक्षलवाद्यांशी कोणत्याही प्रकारे चर्चा होऊ शकत नाही.
यावेळी त्यांनी नक्षलींशी लढणा-या पोलीस, सैनिक यांना विशेष भत्ता देण्यात येईल अशी घोषणा केली.