शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

नक्षलवाद्यांकडून भाजपा नेत्याचं आधी अपहरण, नंतर निर्घृणपणे हत्या; परिसरात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2024 21:00 IST

Naxalites Killed BJP Leader : ही घटना जांगला पोलीस ठाणे हद्दीत घडल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

छत्तीसगडमधील बिजापूरमध्ये नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा भ्याड कृत्य केले आहे. नक्षलवाद्यांनी एका भाजपा नेत्याची हत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, भाजपा नेते कैलाश नाग यांची नक्षलवाद्यांनी निर्घृणपणे हत्या केली आहे. कैलाश नाग हे भाजपा व्यापारी सेलचे मंडळ उपाध्यक्ष होते. कैलास नाग यांचे नक्षलवाद्यांनी आधी अपहरण केले आणि नंतर कुऱ्हाडीने वार करून त्यांची हत्या केली. ही घटना जांगला पोलीस ठाणे हद्दीत घडल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

जांगला पोलीस ठाण्यापासून केवळ 12 किमी अंतरावर कोटामेट्टा परिसरात संबंधित घटना घडली आहे. या परिसरात वन विभागाकडून तलाव बनवण्याचं काम सुरु आहे. काम सुरु असतानाच बुधवारी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास या ठिकाणी काही नक्षलवादी आले. नक्षलवाद्यांनी सर्वात आधी तलाव बनवण्यासाठी काम करत असलेल्या जेसीबीला आग लावून जाळले. त्यानंतर जेसीबीचे मालक कैलाश नाग यांचे अपहरण केले.

कैलाश नाग यांचे अपहरण केल्यानंतर त्यांच्यावर कुऱ्हाडीचे वार करत त्यांची हत्या केली. त्यानंतर नक्षलवादी त्यांचा मृतदेह फेकून दिला आणि तिथून पळ काढला. कैलाश नाग यांचे वय जवळपास 40 वर्षे इतके होते. ते ठेकेदारीचे काम करत होते. तसेच, भाजपाचे नेते देखील होते. त्यांची हत्या करण्यात आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलीस या प्रकरणी आरोपींचा शोध घेत आहेत. हत्या झालेल्या परिसरात पोलिसांची गस्ती वाढवण्यात आली आहे.

एका वर्षात 9 भाजपा नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची हत्यामिळालेल्या माहितीनुसार, नक्षलवाद्यांनी छत्तीसगडमध्ये गेल्या वर्षभरापासून भाजपाच्या 9 नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची हत्या केली आहे. यावर्षी भाजपाच्या दोन नेत्यांची हत्या करण्यात आली आहे. कैलास नाग हे नक्षलवाद्यांकडून हत्या झालेले बिजापूर जिल्ह्यातील चौथे भाजपा नेते आहेत. या घटनेवर भाजपा नेत्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. तसेच, भाजपा नेत्यांनी आरोपी नक्षलवाद्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीChhattisgarhछत्तीसगडBJPभाजपा