शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
2
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
3
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
4
Stock Market Today: शेअर बाजाराचं फ्लॅट ओपनिंग, १११ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; फार्मा-रियल्टी शेअर्स आपटले
5
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
6
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
7
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
8
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
9
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
10
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
11
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
12
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
13
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
14
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
15
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
16
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
17
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
18
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
19
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
20
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा

नक्षलवाद्यांची उडविली दाणादाण

By admin | Updated: February 16, 2015 23:55 IST

मृत्यूच्या गुहेत शिरकाव

मृत्यूच्या गुहेत शिरकाव
नरेश डोंगरे
नागपूर : एका वर्षात तीन घातपात घडवून नक्षल्यांनी ५३ पोलिसांचे बळी घेतल्यामुळे गडचिरोलीतील पोलीस दल थरारले होते. या काळात आर.आर. पाटील पालकमंत्र्याच्या रूपाने ढाण्या वाघासारखे नक्षल्याच्या गुहेत शिरले आणि पुढे त्यांनी नक्षलवाद्यांची अक्षरश: दाणादाण उडवून दिली. आबांच्या निधनाने कर्तव्यकठोर पोलीस अधिकाऱ्यांनाही आठवणींचा गहिवर दाटून आला आहे. धाडसी आबांच्या आठवणींचे काही किस्से संबंधित अधिकाऱ्यांनी आज उघड केले.
२००९-१० मध्ये नक्षलवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यात चुहामाकड, हत्तीटोला आणि मरकेगाव परिसरात मोठे घातपात घडवून ५३ पोलिसांचे बळी घेतले. नक्षल्यांच्या क्रौर्यामुळे पोलीस दल अक्षरश: शहारले होते. अशात आबांनी पालकमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली. धानोरा तालुक्यात पीएससीजवळ घातपाताची घटना घडली. त्यावेळी पावसामुळे तेथे मोठे वाहन जायला मार्ग नव्हता. नक्षलवादी घात लावून बसले असू शकतात, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगूनही आबांनी चक्क मोटरसायकलवरच घटनास्थळ गाठले. परत येईपर्यंत सर्वांच्याच काळजाचे ठोके चुकले होते. सिरोंचा, एटापल्ली, कोरची, चामोर्शी, मुलचेरा भागात हत्या, अपहरण, जाळपोळ करून नक्षल्यांनी नागरिक (अन् पोलिसांनाही) धडकी भरवली होती. कुणी तिकडे फिरकण्याची तसदी घेत नव्हते. आबांनी पोलीस अधीक्षक वीरेश प्रभूंना सोबत घेत चक्क मृत्यूच्या गुहेत शिरकाव केला. दोन दिवस सारखे फिरत त्यांनी नागरिक आणि पोलिसांना आश्वस्त केले. नदीला प्रचंड पूर असताना डोंग्यातून दुर्गम भागात जाणाऱ्या आबांचे धाडस अधिकाऱ्यांसोबतच भाबड्या आदिवासींनाही स्तंभित करणारे होते.
संवेदनशील आबा
गडचिरोली-गोंदियात निमलष्करी दलासह पोलिसांची दुप्पट फोर्स, अत्याधुनिक हत्यारं, हेलिकॉप्टरसोबत पोलिसांचे वाढलेले मनोबल ही आबांचीच देण आहे. प्लाटून कमांडरला पकडल्याबद्दल गोंदियाचे एसपी दिलीप झळकेंना पहाटेच दिलेली शाबासकी, डॉ. आरती सिंह यांच्या कामगिरीसाठी पदकाची शिफारस अन् भल्या पहाटे अपघातात गंभीर जखमी झालेल्या अमित सैनी यांच्या पत्नीला फोन करून हेलिकॉप्टर उपलब्ध करून देण्याची दिलेरी केवळ आबासारखेच नेते दाखवू शकतात. थरारक किस्से सांगताना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा कंठ दाटून येतो, त्यातूनच आबांच्या धाडसी, दिलेर अन् संवेदनशीलवृत्तीचा प्रत्यय यावा.
---