नक्षलवाद्यांनी विस्कळीत केलेली रेल्वेसेवा पूर्ववत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 00:48 IST2017-08-04T00:48:22+5:302017-08-04T00:48:25+5:30

नक्षलवाद्यांनी बिहारमध्ये किऊल-झाझा आणि किऊल- जमालपूर सेक्शनमधील रेल्वे सेवा विस्कळीत केली, दोन केबिन कर्मचाºयांना पळवून नेले व पोलिसांशी त्यांची चकमकही उडाली.

 Naxalites disrupted railway services disrupted | नक्षलवाद्यांनी विस्कळीत केलेली रेल्वेसेवा पूर्ववत

नक्षलवाद्यांनी विस्कळीत केलेली रेल्वेसेवा पूर्ववत

लखीसराई (बिहार) : नक्षलवाद्यांनी बिहारमध्ये किऊल-झाझा आणि किऊल- जमालपूर सेक्शनमधील रेल्वे सेवा विस्कळीत केली, दोन केबिन कर्मचाºयांना पळवून नेले व पोलिसांशी त्यांची चकमकही उडाली.
सहायक पोलीस अधीक्षक पवन कुमार उपाध्याय यांनी गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार १५ ते २० नक्षलवाद्यांनी बुधवारी रात्री किऊल- झाझा सेक्शनमध्ये गोपाळपूर रेल्वे थांबली असता केबिन कर्मचाºयांना पळवून नेले व त्याला रेल्वे सेवा थांबवण्याचा आदेश दिला. त्यामुळे दोन सेक्शनमध्ये रेल्वे सेवा विस्कळीत झाली.
किऊल-जमालपूर रेल्वे सेक्शनमधील उरेन रेल्वे स्थानकाच्या केबिन कर्मचाºयालाही नक्षलवाद्यांनी पळवून नेले व सगळ््या रेल्वे सेवा थांबवण्यास सांगितले. या सेक्शनमधील रेल्वे सेवा गुरुवारी सकाळी ४ वाजता पूर्ववत झाल्या. अपहृत कर्मचाºयांनाही नक्षलवाद्यांनी सोडून दिले.
नक्षलवादी निषेध सप्ताह साजरा करीत असल्याचे सांगण्यात आले. पोलीस आणि नक्षलवाद्यांत किऊल-झाझा रेल्वे सेक्शनमधील भालुई रेल्वे स्थानकानजिक चकमकही उडाली होती. (वृत्तसंस्था)
गोळीबार करून फरार-
केंद्रीय राखीव पोलीस दल, स्पेशल टास्क फोर्स, जिल्हा पोलीस आणि कोब्रा बटालियनच्या तुकड्यांनी प्रतिकारादाखल केलेल्या गोळीबारानंतर नक्षलवादी फरार झाले. या चकमकीत कोणीही जखमी वा जीवित हानी झालेली नाही, असेही ते म्हणाले. नक्षलवाद्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी मोहीम सुरू केल्याची माहिती उपाध्याय यांनी दिली.

Web Title:  Naxalites disrupted railway services disrupted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.