पोलीस ठाण्यांवर नक्षलवाद्यांचा हल्ला
By Admin | Updated: December 6, 2014 23:47 IST2014-12-06T23:47:46+5:302014-12-06T23:47:46+5:30
छत्तीसगडच्या दक्षिण बस्तरमधील सुकमा जिल्ह्यात शुक्रवारी रात्री नक्षलवाद्यांनी सहा पोलीस ठाण्यांवर हल्ला केला.

पोलीस ठाण्यांवर नक्षलवाद्यांचा हल्ला
जगदलपूर : छत्तीसगडच्या दक्षिण बस्तरमधील सुकमा जिल्ह्यात शुक्रवारी रात्री नक्षलवाद्यांनी सहा पोलीस ठाण्यांवर हल्ला केला. या भागातील भेज्जी, दरबागुडा, कोंटा, इंज्राम, गोरखा आणि इरेगट्टा पोलीस ठाण्यांवर नक्षल्यांनी हल्ला केल्यानंतर सीआरपीएफच्या जवानांनी प्रत्युत्तर दिले. बराच काळ चकमकी झडल्या. दोन्ही बाजूकडील प्राणहानी झाल्याचे वृत्त नाही.
या भागात हेलिकॉप्टरद्वारे गस्त सुरू आहे. याच जिल्ह्यातील चिंतागुफा भागात सोमवारी नक्षल्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे 14 जवान शहीद झाले. त्यानंतर सतर्कता बाळगली जात असतानाही पोलीस ठाण्यांना लक्ष्य बनविण्यात आले.(वृत्तसंस्था)