छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा हल्ला : १३ जवान शहीद
By Admin | Updated: December 1, 2014 18:02 IST2014-12-01T17:47:40+5:302014-12-01T18:02:49+5:30
छत्तीसगडमधील सुकमा जिल्हयात नक्षलवाद्यांनी केलेल्या अचानक हल्ल्यात १३ जवान शहीद झाल्याचे वृत्त आहे. नक्षलवाद्यांनी केलेला हा हल्ला या वर्षातील सर्वात मोठा हल्ला मानण्यात येत आहे.

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा हल्ला : १३ जवान शहीद
ऑनलाइन लोकमत
सुकमा, दि. १ - छत्तीसगडमधील सुकमा जिल्हयात नक्षलवाद्यांनी केलेल्या अचानक हल्ल्यात १३ जवान शहीद झाल्याचे वृत्त आहे. नक्षलवाद्यांनी केलेला हा हल्ला या वर्षातील सर्वात मोठा हल्ला मानण्यात येत आहे.
सुकमा जिल्हयातील चिंतागुफा येथे सीआरएफचे जवान कोम्बिंग ऑपरेशन राबवित होते. त्यांचे हे ऑपरेशन सुरू असतानाच सोमवारी दुपारी नक्षलवाद्यांनी जवानांवर अचानक हल्ला चढवला. अचानक हल्ला झाल्याने जवानांना काही समजण्याच्या आत मृत्यूला कवटाळावे लागले. अचानक झालेल्या हल्ल्यात एकाचवेळी १३ जवान शहीद झाले. या ठिकाणी सीआरपीएफच्या तीन तुकडया कार्यरत होत्या. शहीद झालेल्या जवानांमध्ये सीआरपीएफच्या डेप्यूटी कंमाडर आणि असिस्टंट कमांडरचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.