नक्षल्यांना अभय; आमदारास अटक
By Admin | Updated: October 6, 2014 06:06 IST2014-10-06T06:06:01+5:302014-10-06T06:06:01+5:30
नक्षली संघटना चालविणे आणि गुन्हेगारांना अभय देण्याच्या आरोपानंतर राजीनामा देऊन फरार झालेले झारखंडचे माजी मंत्री आणि काँगे्रस आमदार योगेंद्र साव यांना काल शनिवारी नवी दिल्लीत अटक करण्यात आली़

नक्षल्यांना अभय; आमदारास अटक
रांची/नवी दिल्ली : नक्षली संघटना चालविणे आणि गुन्हेगारांना अभय देण्याच्या आरोपानंतर राजीनामा देऊन फरार झालेले झारखंडचे माजी मंत्री आणि काँगे्रस आमदार योगेंद्र साव यांना काल शनिवारी नवी दिल्लीत अटक करण्यात आली़ येथील एका न्यायालयाने त्यांची तीन दिवसांच्या ट्रान्जिट रिमांडवर रवानगी केली़
सप्टेंबरच्या मध्याला झारखंडच्या हजारीबाग न्यायालयाने साव आणि अन्य तिघांविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केला होता़ एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गत १ सप्टेंबरला झारखंड पोलिसांनी झारखंड टायगर्स ग्रुपच्या पाच सदस्यांना अटक केली होती़ चौकशीदरम्यान त्यांनी साव यांच्या नावाचा खुलासा केला होता़ खंडणी वसूल करणे, अपहरण आणि हत्या अशा गुन्ह्णांसाठी साव यांनी कथितरीत्या शस्त्रे, स्फोटके आणि वाहने पुरविल्याची माहिती त्यांनी दिली होती़