शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED चा भीषण स्फोट; ASP आकाश राव शहीद, अनेक जवान जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 12:24 IST

छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे.

Naxalite News: गेल्या काही महिन्यांपासून छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरुद्ध तीव्र मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेत सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. यामुळेच अनेक जिल्ह्यांमधून नक्षलवाद्यांचा पूर्णपणे खात्मा करण्यात आला आहे. दुसरीकडे, या कारवाईने संतप्त झालेल्या नक्षलवाद्यांनी आज एक मोठी घटना घडवून आणली आहे. 

सोमवारी छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पेरलेल्या आयईडी स्फोट झाला. या घटनेत अतिरिक्त पोलिस अधीक्षक (कोंटा विभाग) आकाश राव गिरीपुंजे शहीद झाले आहेत, तर अनेक पोलिस जखमी झाले आहेत. ही घटना दोंड्रा गावाजवळ घडली. जखमींना कोंटा रुग्णालयात नेण्यात आले आहे. दरम्यान, ही घटना नक्षलवाद्यांनी पुकारलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या गस्तीदरम्यान घडली. 

उपचारादरम्यान एएसपींचा मृत्यूसीपीआय(एम) ने १० जून रोजी भारत बंदच्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांच्या कोणत्याही घटनेला रोखण्यासाठी एएसपी आकाश राव गिरीपुंजे परिसरात पायी गस्त घालत होते. यादरम्यान आयईडीचा स्फोट झाला, ज्यात आकाश राव गंभीर जखमी झाले, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात शोध मोहीम वाढवली आहे.

हा आमच्यासाठी दुःखद क्षण छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शामरा यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केले. ते म्हणाले, एएसपी आकाश राव एक शूर सैनिक होते. त्यांना अनेक शौर्य पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. हा आमच्यासाठी दुःखद क्षण आहे. 

यापूर्वीही असे स्फोट झालेयापूर्वी ६ जानेवारी २०२५ रोजी विजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या एका मोठ्या हल्ल्यात ९ जण शहीद झाले होते, ज्यात ८ सुरक्षा कर्मचारी आणि एक चालकाचा समावेश होता. हा हल्ला ६०-७० किलो वजनाच्या आयईडीने करण्यात आला होता, जो गेल्या दोन वर्षात राज्यातील सुरक्षा दलांवर झालेला सर्वात मोठा हल्ला होता.

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडnaxaliteनक्षलवादीCrime Newsगुन्हेगारीBlastस्फोट