नक्षलवादी हॅलिकॉप्टर बनवण्याच्या प्रयत्नात
By Admin | Updated: May 18, 2015 17:21 IST2015-05-18T17:21:35+5:302015-05-18T17:21:35+5:30
नक्षलवादी हॅलिकॉप्टर बनवण्याच्या प्रयत्नात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

नक्षलवादी हॅलिकॉप्टर बनवण्याच्या प्रयत्नात
>ऑनलाइन
पाटणा,दि. १८ - नक्षलवादी हॅलिकॉप्टर बनवण्याच्या प्रयत्नात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
केंद्रीय पोलीस दलाच्या हाती लागलेल्या कागदपत्रांवरून ही माहिती उघड झाली आहे. या करता नक्षलवादी आवश्यक सामग्री जमवण्याचे प्रयत्न करत असून हिरो होंडाच्या दोन इंजीनवर चालणारे हे हॅलिकॉप्टर असणार आहे. अनुज असे संकेतिक नाव असणा-या नक्षलवादी नेत्याचा हॅलिकॉप्टर बनवून देणा-या व्यक्तिशी संपर्क झाला असल्याची माहिती मिळाली आहे. व्यक्ती व सामानाची ने आण करण्याच्या क्षमतेचे हे हॅलिकॉप्टर असणार आहे. गाडी उपलब्ध झाल्यास या प्रकारची आणखी काही हॅलिकॉप्टर बनवण्यात येतील असे नक्षलवादी नेत्यांच्या केंद्रीय समितीच्या पत्रातील माहितीतून उघड झाले आहे.
नुकतेच गया येथे तीन वरीष्ठ नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे. तसेच शनिवारी रात्री झालेल्या चकमकित तीन नक्षली नेत्यांना पोलिसांनी कंठस्नान घातले. वाळूचे ट्रक, पेट्रोल पंप इत्यादी ठिकाणांहून लेवीज वसूल करण्यात येत असल्याचेही सांगण्यात येत आहे. बिहार मधील जुमई जिल्ह्यातील काही ठिकाणांचा व्हिडिओ मिळाला असून त्या ठिकाणी भविष्यात घातपात होण्याची शक्यता आहे.