शिवसेनेमुळे नवाजुद्दीनला 'रामलीला'मध्ये नो एन्ट्री

By Admin | Updated: October 6, 2016 13:48 IST2016-10-06T11:56:32+5:302016-10-06T13:48:37+5:30

आपल्या दमदार अभिनयासाठी प्रसिद्ध असलेला बॉलिवूडचा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी मुझफ्फरनगरमध्ये होणा-या 'रामलीला' या कार्यक्रमात सहभागी होऊ शकणार नाही.

Nawazuddin no entry in 'Ramleela' due to Shivsena | शिवसेनेमुळे नवाजुद्दीनला 'रामलीला'मध्ये नो एन्ट्री

शिवसेनेमुळे नवाजुद्दीनला 'रामलीला'मध्ये नो एन्ट्री

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि.6 -आपल्या दमदार अभिनयासाठी प्रसिद्ध असलेला बॉलिवूडचा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी मुझफ्फरनगरमध्ये होणा-या 'रामलीला' या कार्यक्रमात सहभागी होऊ शकणार नाही. नवाजुद्दीन 'रामलीला'मध्ये 'मारीच'ची भूमिका साकारणार होता. मात्र शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी 'रामलीला'तील नवाजुद्दीन सिद्दीकीच्या सहभागावर आक्षेप घेत त्याला विरोध केला आहे.
'रामलीला'तील आपल्या सहभागामुळे आणखी वाद वाढू नये, यासाठी नवाजुद्दीननेही यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे.
 
 
आणखी बातम्या 
 
नवाजुद्दीन सध्या आपल्या बुढाना गावी आहे. यावेळी त्याला 'रामलीला'तील मारीचच्या भूमिकाबाबत विचारण्यात आले होते.नवाजुद्दीननेही याला होकार कळवला. ही भूमिका साकारण्यासाठी त्याने रिहर्सलदेखील केली होती.  'रामलीला'मध्ये नवाजुद्दीनला पाहायला मिळणार, यामुळे स्थानिक नागरिक देखील खूश होते. मात्र शिवसेनेने विरोध केल्यामुळे नवाजुद्दीन सिद्दीकी ही भूमिका साकारू शकणार नाही. 
 

 

Web Title: Nawazuddin no entry in 'Ramleela' due to Shivsena