नवाज शरीफ बालंबाल बचावले
By Admin | Updated: August 3, 2015 00:13 IST2015-08-03T00:13:32+5:302015-08-03T00:13:32+5:30
पाकिस्तानचे पंतप्रधान

नवाज शरीफ बालंबाल बचावले
प किस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ बालंबाल बचावलेइस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांचे कुटुंबीय रविवारी रात्री बालंबाल बचावले. मुरीच्या हिल रिसॉर्टवरून इस्लामाबादकडे परतत असताना शरीफ यांच्या वाहनांच्या ताफ्यात अन्य एका वाहनाने घुसखोरी केली. ते वाहन शरीफ यांच्या वाहनाच्या अगदी जवळ गेले होते. यावेळी शरीफ यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी कुलसूम आणि कन्या मरियम होत्या. शरीफ यांचे प्रवक्ते असिफ किरमानी यांनी सांगितले की, शरीफ आणि त्यांचे कुटुंबीय सुरक्षित आहेत. घुसखोरी करणार्या वाहनाच्या चालकाला अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे शरीफ आज नेहमीप्रमाणे शिष्टाचार न पाळता आणि या मार्गावर फारशा सुरक्षेविना प्रवास करीत होते. ते नेहमीच फारसा लवाजमा न बाळगता या मार्गावरून जात असतात. जिओ टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, घुसखोरी करणार्या वाहनचालकाचे नाव हफीस-उर-रेहमान असून, पाक हवाई दलाचा तो निवृत्त अधिकारी आहे.