नवर्याने केले बायकोवर कोयत्याने वार निमखेडी शिवारातील घटना : हल्ल्यानंतर पती फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2016 00:41 IST2016-05-20T00:41:56+5:302016-05-20T00:41:56+5:30
जळगाव: नांदायला येत नाही म्हणून नवर्याने बायकोवर ऊस तोडण्याच्या कोयत्याने मानेवर व पाठीवर जोरदार वार केले. ही घटना गुरुवारी संध्याकाळी सात वाजता दूध फेडरेशनजवळी निमखेडी शिवारातील जुन्या झोपडपीजवळ घडली. हल्लयानंतर नवरा फरार झाला आहे. जखमी महिलेला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिचा प्रकृती चिंताजनक आहे.

नवर्याने केले बायकोवर कोयत्याने वार निमखेडी शिवारातील घटना : हल्ल्यानंतर पती फरार
ज गाव: नांदायला येत नाही म्हणून नवर्याने बायकोवर ऊस तोडण्याच्या कोयत्याने मानेवर व पाठीवर जोरदार वार केले. ही घटना गुरुवारी संध्याकाळी सात वाजता दूध फेडरेशनजवळी निमखेडी शिवारातील जुन्या झोपडपीजवळ घडली. हल्लयानंतर नवरा फरार झाला आहे. जखमी महिलेला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिचा प्रकृती चिंताजनक आहे.याबाबत जखमीच्या नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, दूध फेडरेशनजवळील झोपडपी भागात अनिता बद्रीनाथ चव्हाण (वय २४) ही विवाहिता दोन मुलांसह राहते. नवरा बद्रीनाथ तारासिंज चव्हाण (वय ३० रा.गवळी जामन्या, खंडवा) याला दारु व पत्याचे व्यसन आहे. त्यामुळे त्याने त्याची शेती विकून तो पैसा व्यसनातच वाया घालविला. बायको अनितालाही तो त्रास देत होता. त्यामुळे वडील कस्तुरबा दरबार बंजारा यांनी तिला त्यांच्या मुलांकडे जळगावात आणले होते. विष्णू , दिनेश व भोलेशंकर बंजारा या तीन भावांजवळ शेजारी घर घेऊन ती मुलासह राहत होती.काही दिवस नवराही सोबत राहिला, मात्र त्याला व्यसन असल्याने तो सतत त्रास देत असल्याने तो तेथून निघून गेला होता.दबा धरुन केले वारबद्रीनाथ हा बायकोला गावाकडे घेऊन जाण्याचा आग्रह करीत होता. त्यातून त्यांच्यात वाद झाले होते. गुरुवारी तो एका मित्राला घेऊन दुचाकीवर आला. शौचालयाकडे जाणार्या रस्त्यावर हातात ऊस तोडण्याचा कोयता घेऊन दबा धरून बसला होता. अनिता व एक महिला सोबत येत असताना ब्रदीनाथने मागून तिच्या मानेवर व पाठीवर जोरदार वार केले. यानंतर दोघंही तेथून फरार झाले. यात तिच्या पाठीवर मोठा खड्डा पडला आहे. जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर डॉक्टरांनी तिला औरंगाबाद किंवा मुंबईला हलविण्याचा सल्ला दिला.