नौदलाचे जहाज बुडाले, एक ठार, चार बेपत्ता
By Admin | Updated: November 7, 2014 11:11 IST2014-11-07T09:20:43+5:302014-11-07T11:11:40+5:30
भारतीय नौदलाचे ‘टॉर्पिडो रिकव्हरी व्हेसल’ हे छोटे जहाज गुरुवारी विशाखापट्टणम बंदराजवळ समुद्रात बुडाले. या अपघातात जहाजावर तैनात असलेलला एक नाविक मृत्युमुखी पडला आहे.

नौदलाचे जहाज बुडाले, एक ठार, चार बेपत्ता
विशाखापट्टणम/नवी दिल्ली : भारतीय नौदलाचे ‘टॉर्पिडो रिकव्हरी व्हेसल’ हे छोटे जहाज गुरुवारी विशाखापट्टणम बंदराजवळ समुद्रात बुडाले. या अपघातात जहाजावर तैनात असलेलला एक नाविक मृत्युमुखी पडला असून अन्य चार नाविक बेपत्ता असल्याचे वृत्त आहे. जहाजावर २८ कर्मचारी होते. त्यापैकी २३ कर्मचाऱ्यांना वाचविण्यात आले आहे. बेपत्ता असलेल्या कर्मचाऱ्यांचा शोध घेतला जात आहे. गुरुवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला.
युद्धनौका आणि पाणबुड्यांनी सरावादरम्यान डागलेले तोफगोळे शोधण्याचे काम या जहाजाकडे सोपविण्यात आले होते. नेहमीप्रमाणे हे जहाज तोफगोळे (टॉर्पिडो) शोधण्याच्या कामात असताना अचानक एका कक्षात पाणी घुसले आणि काही मिनिटातच जहाज समुद्रात बुडाले. हे जहाज डमी तोफगोळे गोळा करून परत येत असताना त्यात पाणी घुसले. विझाग पोस्टपासून अनदाजे १० ते १५ कि. मी. अंतरावर हे जहाज बुडाल्याचे कळते.