नौसेनेचे हेलिकॉप्टर कुटुंबीयांसाठी वापरले नाही- जेटली
By Admin | Updated: December 27, 2014 18:55 IST2014-12-27T18:55:19+5:302014-12-27T18:55:19+5:30
नवी दिल्ली-केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी, त्यांची पत्नी व कन्येकरिता २३ डिसेंबर रोजी गोव्यात नौसेनेच्या हेलिकॉप्टरचा वापर केल्याच्या वृत्ताला फेटाळून लावले आहे. प्रसिद्धीमाध्यमांनी, संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या सांगण्यावरून जेटली यांच्या पत्नी व मुलीला नौसेनेच्या हेलिकॉप्टरमधून डमबोलिन विमानतळाच्या रिसॉर्टमधून दक्षिण गोव्याच्या कानकोलापर्यंत पोहचविल्याचा दावा केला होता.

नौसेनेचे हेलिकॉप्टर कुटुंबीयांसाठी वापरले नाही- जेटली
न ी दिल्ली-केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी, त्यांची पत्नी व कन्येकरिता २३ डिसेंबर रोजी गोव्यात नौसेनेच्या हेलिकॉप्टरचा वापर केल्याच्या वृत्ताला फेटाळून लावले आहे. प्रसिद्धीमाध्यमांनी, संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या सांगण्यावरून जेटली यांच्या पत्नी व मुलीला नौसेनेच्या हेलिकॉप्टरमधून डमबोलिन विमानतळाच्या रिसॉर्टमधून दक्षिण गोव्याच्या कानकोलापर्यंत पोहचविल्याचा दावा केला होता. जेटली यांनी आपल्या फेसबुकवर, ही बातमी तीन बाबतीत चुकीची असल्याचे म्हटले आहे. प्रथम माझी पत्नी व माझा मुलगा हे २३ डिसेंबरला गोव्यात होते. मुलगी सोबत नव्हती. दुसरे, त्यांनी कुठल्याही प्रकारच्या सरकारी सोयी घेतल्या नाहीत व नौसेनेच्या हेलिकॉप्टरचाही वापर केला नाही. तिसरे, संरक्षणमंत्री पर्रीकर यांनी लष्कराच्या कुठल्याही हेलिकॉप्टरच्या वापरासाठी परवानगी दिली नाही. माझ्या कुटुंबीयांचा तो अत्यंत खाजगी दौरा होता. मुख्य म्हणजे पर्रीकर यांनाही माझे कुटुंबीय गोव्यात असल्याचे माहीत नव्हते. कोणालाही खोटेपणाचा बडेजाव करण्याचा व त्याचा प्रसिद्धीमाध्यमांमध्ये प्रचार करण्याचा अधिकार नाही. प्रसिद्धीमाध्यमांनी याप्रकरणी माफी मागावी अशी मागणी जेटलींनी केली आहे.