शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
5
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
6
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
7
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
8
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
9
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
10
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
11
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
12
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
13
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
14
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
15
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
16
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

Navneet Rana : "हिंदू संस्कृतीवर डाग लागला; 2 तरुणींशी लग्न करणाऱ्यावर कारवाई व्हावी"; नवनीत राणांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 12:27 IST

Navneet Rana : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी हा मुद्दा उपस्थित केला. तसेच कारवाईची मागणी केली आहे.

काही दिवसांपूर्वी जुळ्या बहिणींनी एकाच तरुणाशी लग्न केल्याने मोठी चर्चा रंगली होती. सोलापूरच्या अतुल आवताडे या तरुणाने एकाच मांडवात दोन जुळ्या बहिणींसोबत लग्न केलं. या लग्नाचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले होते. त्यानंतर एकाचवेळी दोन मुलींशी लग्न केल्याप्रकरणी नवरदेव अतुल अवताडे चांगलाच अडचणीत आला. अकलूज पोलीस ठाण्यात अतुलविरोधात तक्रार नोंदवण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून न्यायालयासमोर हे प्रकरण नेले. मात्र सोलापूर न्यायालयाने या प्रकरणात दिलेल्या महत्त्वपूर्ण टिप्पणीमुळे अतुलला मोठा दिलासा मिळाला आहे.

खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी हा मुद्दा संसदेत उपस्थित केला. तसेच कारवाईची मागणी केली आहे. "सोलापूरच्या अकलूजमध्ये एक घटना घडली त्यामुळे हिंदू संस्कृतीवर डाग लागला. एका तरुणाने एकाच मांडवात दोन तरुणींशी लग्न केलं. कलम 494, 495 हे कायदे देशात आहेत. पण देशात अद्यात एका वेळी दोन मुलींशी लग्न करण्याबाबत कोणताही ठोस कायदा बनवण्यात आलेला नाही. यासाठी काहीतरी नवा कायदा बनवणं गरजेचं आहे. जे असं लग्न करतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. जेणे करून अशा घटना भविष्यात घडणार नाहीत. यामुळे संस्कृतीला धक्का लागतो आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून यांचे फोटो व्हायरल होत आहेत" असं नवनीत राणा यांनी म्हटलं आहे. 

अतुलविरोधात दाखल झालेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी न्यायालयात तपास करण्याची परवानगी मागितली असता, न्यायालयाने अदखलपात्र गुन्ह्यात तपास करता येत नाही असे आदेश दिले, अशी माहिती पोलीस अधिक्षकांनी दिली. न्यायालयात यावर सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने पीडित कोण आहे?, असे विचारले. कारण तक्रार करणारा हा पीडित नव्हता. जुळ्या बहिणींपैकी कोणी असेल किंवा संबंधित लग्न करणाऱ्याचे पाहिले लग्न झाले असेल आणि पहिल्या बायकोने तक्रार दिली असेल तर तपास करा, असा आदेश न्यायालयाने दिल्याचं पोलीस अधीक्षकांनी सांगितलं. 

नेमकं प्रकरण काय?

जन्म, बालपण, शिक्षणच काय, तर नोकरीही एकत्रित असा जीवनाचा प्रवास एकत्रित करणाऱ्या रिंकी व पिंकी या जुळ्या बहिणींची ही आयुष्याची गोष्ट. दोघींना एकमेकींची इतकी सवय लागली की, त्या एकमेकींशिवाय राहणे कठीण बनले होते. इतकेच काय, तर एकमेकींची आवड- निवडही एकसारख्याच झाल्या होत्या. कांदिवली येथील रिंकी व पिंकी उच्च विभूषित असून आयटी क्षेत्रात मोठ्या पगारावर नोकरी करणाऱ्या जुळ्या बहिणी. वडिलांच्या पश्चात आईसोबत राहत होत्या. 

सहा महिन्यांपूर्वी रिंकी, पिंकी व आई आजारी पडल्या होत्या. यावेळी अंधेरी येथे राहणाऱ्या अतुल या टॅक्सी ड्रायव्हरने तिघींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तिघींच्या कुटुंबात पुरुष नसल्याने माणुसकीच्या नात्याने अतुलने तिघींची रात्रंदिवस सेवा केली. यामुळे तिघींना अतुलविषयी आपुलकी निर्माण झाली. यातूनच जुळ्या बहिणींतील एकीचे प्रेम हे अतुलबरोबर जडले, पण दोघींनी एकमेकींना कधीच सोडले नसल्याने त्या विभक्त होऊन राहू शकत नसल्याने दोघींनी अतुलशी विवाह करण्याचा निर्णय घेतला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :navneet kaur ranaनवनीत कौर राणाmarriageलग्नSolapurसोलापूर