शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

"हनुमान चालीसा म्हटल्यास जीवे मारू", नवनीत राणांना धमकीचा फोन, पोलिसांत तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2022 18:40 IST

Navneet Rana : नवनीत राणा यांनी याबाबात नवी दिल्लीतील नॉर्थ अवेन्यू पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे.

नवी दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून विविध वादांमुळे चर्चेत असलेल्या अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) म्हटल्यास तुम्हाला जीवे मारू अशी धमकी दिल्याची तक्रार नवनीत राणा यांच्याकडून करण्यात आली आहे. नवनीत राणा यांनी याबाबात नवी दिल्लीतील नॉर्थ अवेन्यू पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे.

स्वतःला धर्मगुरू म्हणवून घेणाऱ्या एका व्यक्तीने फोन करून महाराष्ट्रात हनुमान चालीसा म्हणून दाखवा, असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे खासदार नवनीत राणा यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले. दरम्यान, याप्रकरणी नवनीत राणा यांनी नॉर्थ अव्हेन्यू पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.  त्यामुळे आता या प्रकरणाचा तपास दिल्ली पोलिसांनी सुरू केला आहे. 

पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, नवनीत राणा यांच्या फोनवर जवळपास अकरा वेळा फोन करण्यात आला होता. सार्वजनिकपणे हनुमान चालीसा पठण करण्याचा प्रयत्न केल्यास जीवे मारु, अशी धमकी देण्यात आले आहे. तसेच, नवनीत राणा यांनी त्या व्यक्तीने फोनवरुन शिवीगाळ केल्याचा दावा करण्यात आला आहे. 

गेल्या काही दिवसांपासून नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी हनुमान चालीसा मुद्दा लावून धरला होता. याच मुद्द्यावरून त्यांना जेलवारीही करावी लागली आहे. दरम्यान, खासदार नवनीत राणा यांना धमकी येण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी  नवनीत राणा  यांच्यावर अ‍ॅसिड फेकण्याची एका अज्ञाताने धमकी दिली असल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला होता. 

हनुमान चालीसावरून राणा दाम्पत्याची जेलवारीखासदार नवनीत राणा  आणि आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा दिल्यानंतर मुंबईत मोठा गदारोळ झाला होता. यामुळे राणा दाम्पत्याला जेलवारी सुद्धा करावी लागली. गेल्या काही दिवासांपूर्वीच नवनीत राणा आणि रवी राणा यांनी मातोश्रीच्या बाहेरच हनुमान चालीसा पठणाचा हट्ट धरला होता. त्यानंतर शिवसेनाही आक्रमक झाल्याचे दिसून आले. हा वाद एवढा वाढला की नवनीत राणा आणि रवी राणा यांना जेलमध्ये जावे लागले होते. यातच आता पुन्हा हनुमान चालीसा पठणावरूनच नवनीत राणा यांना धमकी आल्याने पुन्हा एकदा राजकारणात खळबळ माजली आहे.  

टॅग्स :navneet kaur ranaनवनीत कौर राणाRavi Ranaरवी राणाCrime Newsगुन्हेगारी