नवज्योत सिंग सिद्धू 15 ऑगस्टला 'आप'मध्ये करणार प्रवेश
By Admin | Updated: July 28, 2016 19:36 IST2016-07-28T18:15:26+5:302016-07-28T19:36:39+5:30
नवज्योत सिंग सिद्धू 15 ऑगस्ट रोजी आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे

नवज्योत सिंग सिद्धू 15 ऑगस्टला 'आप'मध्ये करणार प्रवेश
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 28 - गेल्या काही दिवसांपूर्वीच माजी कसोटी क्रिकेटपटू व राज्यसभेतील राष्ट्रपतीनियुक्त सदस्य नवज्योत सिंग सिद्धू यांनी खासदारकीचा राजीनामा देत भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. आता ते 15 ऑगस्ट रोजी आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. पंजाबमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिद्धू यांच्या पक्षातील प्रवेशामुळे आम आदमी पार्टीला मोठा फायदा होणार आहेत. मात्र ते आम आदमी पार्टीकडून पंजाबमध्ये मुख्यमंत्रिपदाची उमेदवार नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. तर भाजपला हा मोठा धक्का मानला जातो आहे.
दरम्यान यापूर्वी सिद्धू भाजप पक्षावरील नाराजी व्यक्त केली होती. पक्ष माझ्याकडे दुर्लक्ष करीत असून देशातील तरुणांची सेवा करण्याची संधी पक्षनेतृत्वाने दिली नसल्याची भावना नवज्योत सिद्धूनं व्यक्त केली होती. भाजपला आणि देशाला द्यावे असे माझ्याकडे बरेच काही होते; मात्र पक्षाला मला पंजाब निवडणुकीपासून दूर ठेवायचं असल्यानं मी राजीनामा दिल्याचं यावेळी नवज्योत सिंग सिद्धूनं सांगितलं.
(नवज्योतसिंग सिद्धू यांनी आळवला उपेक्षेचा राग)
(नवज्योत सिंग सिद्धूचा भाजपाला रामराम, दिला राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा)