शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

नवज्योत सिद्धू देणार राजीनामा?; राजकीय संन्यास घेणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2019 04:32 IST

गांधी यांचा अमेठीत पराभव झाल्यास आपण राजकीय संन्यास घेऊ, अशी घोषणा करणारे क्रिकेटपटू व पंजाबचे मंत्री नवज्योत सिंग सिद्धू राजकीय संन्यास घेणार का? मंत्रीपदाचा खरोखर राजीनामा देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

- बलवंत तक्षक चंदिगड : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा अमेठीत पराभव झाल्यास आपण राजकीय संन्यास घेऊ, अशी घोषणा करणारे क्रिकेटपटू व पंजाबचे मंत्री नवज्योत सिंग सिद्धू राजकीय संन्यास घेणार का? मंत्रीपदाचा खरोखर राजीनामा देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. खरे तर काँग्रेसमधील अनेक जणांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणीही सुरू केली आहे.स्मृती इराणी यांनी या वेळी राहुल गांधी यांना आपण पराभूत करू, असा दावा केला होता. त्यावर अमेठीतील सभेत नवज्योत सिंग सिद्धू यांनी राहुल गांधीच विजयी होतील आणि तसे न झाल्यास आपण राजकीय संन्यासच घेऊ , अशी घोषणा केली होती. ती घोषणाच त्यांना आता अडचणीची बनली आहे. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग व नवज्योत सिंग सिद्धू यांचे अजिबात पटत नाही. त्यामुळे कदाचित तेच सिद्धू यांना दूर करतील, अशीही चर्चा सुरू झाली आहे.कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी नवज्योत सिद्धू यांना पंजाबमध्ये प्रचार करू नका, असे सांगितले होते. त्यावर पंजाबमध्ये काँग्रेसचा विजय झाल्यास त्याचे श्रेय कॅप्टनना मिळेल. पण काँग्रेस पराभूत झाल्यास अमरिंदर सिंग यांना त्याची जबाबदारी घ्यावी लागेल, असे विधान सिद्धू यांनी केले होते. तेव्हापासून दोघांमधील वाद अधिकच उफाळला. त्यात पंजाबमध्ये काँग्रेसला चांगले यशही मिळाले आहे.>मुख्यमंत्र्यांवरही टीका : भटिंडा येथे काँग्रेसच्या प्रचारासाठी गेलेल्या सिद्धू यांनी प्रकाशसिंग बादल कुटुंब व मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यात मैत्रीपूर्ण सामना सुरू असल्याचे वक्तव्य केले होते. बादल यांच्यावर कारवाई करण्यास मुख्यमंत्री टाळाटाळ करीत आहेत. त्यांनी कारवाई न केल्यास आपण राजीनामा देऊ , असा इशाराही सिद्धू यांनी दिला होता. त्यामुळे सिद्धू यांच्या राजीनाम्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. काही जण तर सिद्ध यांनी आता राजकीय संन्यासच घ्यावा, असा सल्ला देताना दिसत आहेत.

टॅग्स :Navjot Singh Sidhuनवज्योतसिंग सिद्धू