शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

'शेतकरी वर्षभर आंदोलन करत होते, पंतप्रधान फक्त 15 मिनिटांत अस्वस्थ झाले'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2022 17:24 IST

Navjot Singh Sidhu: पंजाब प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू म्हणाले की, “शेतकरी दिल्लीच्या सीमेवर एका वर्षाहून अधिक काळ धरणे धरून बसले होते, परंतु काल जेव्हा पंतप्रधानांना सुमारे 15 मिनिटे थांबावे लागले तेव्हा ते अस्वस्थ झाले.

चंदीगड: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंजाबमधील फिरोजपूर रॅली रद्द झाल्यानंतर विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पीएम मोदींच्या सुरक्षेत त्रुटी असल्याची चर्चा आहे. भटिंडा विमानतळावरgन रस्त्याने फिरोजपूरला जात असताना शेतकऱ्यांची निदर्शने सुरू होती. त्यामुळे पीएम मोदींचा ताफा 15-20 मिनिटे फ्लायओव्हरवर अडकून पडला होता. यानंतर पंतप्रधान मोदींचा ताफा भटिंडा विमानतळावर परतला. या घटनेनंतर गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी ट्विट करत पंजाब सरकारवर निशाणा साधला आहे.

आरोप-प्रत्यारोपांच्या दरम्यान पंजाब प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी शेतकरी आंदोलनावरुन नरेंद्र मोदींवर टीकास्त्र डागले. शेतकरी दिल्लीच्या सीमेवर एका वर्षाहून अधिक काळ आंदोलन केल. त्यांच्याबद्दल कुणी विचारणा केली नाही, पण काल ​​जेव्हा पंतप्रधानांना फक्त 15 मिनिटे थांबावे लागले तेव्हा ते अस्वस्थ झाले. त्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे, हा दुटप्पीपणा का? असा सवाल सिद्धूंनी केला. तसेच, मोदीजी, तुम्ही शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करू असे सांगितले होते, पण त्यांच्याकडे जे होते तेही तुम्ही काढून घेतले, अशी टीकाही केली.

'जिवंत आलो, मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा'उड्डाणपुलावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको केल्यामुळे बुधवारी पंतप्रधानांचा ताफा रॅलीच्या ठिकाणी पोहचू शकला नाही. यानंतर पंतप्रधानांनी आपली सभा रद्द करुन भटिंडा विमानतळावर परतले. भटिंडा विमानतळावर परत येताना मोदी तिथल्या अधिकाऱ्यांना म्हणाले, "भटिंडा विमानतळापर्यंत मी जिवंत परत येऊ शकलो याबद्दल तुमच्या मुख्यमंत्र्यांचे आभार." दरम्यान, या घटनेनंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने या घटनेला पंतप्रधानांच्या सुरक्षेतील 'गंभीर त्रुटी' असल्याचे म्हटले आहे. 

गृहमंत्रालयाने अहवाल मागवला

गृह मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्याने पंजाबच्या दौऱ्यादरम्यान गंभीर सुरक्षा उल्लंघनानंतर परतण्याचा निर्णय घेतला. निवेदनात मंत्रालयाने पंजाब सरकारला या त्रुटीची जबाबदारी निश्चित करण्यास आणि कठोर कारवाई करण्यास सांगितले आहे. पंतप्रधान भटिंडाहून हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकाकडे जात असताना ही घटना घडली.

टॅग्स :Navjot Singh Sidhuनवज्योतसिंग सिद्धूNarendra Modiनरेंद्र मोदीPunjabपंजाब