दिल्लीच्या धौला कुआन परिसरात झालेल्या बीएमडब्ल्यू अपघाताने राजधानी हादरली आहे. भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयातील डेप्युटी सेक्रेटरी नवजोत सिंग यांच्या मृत्यूनंतर कुटुंबाने गंभीर आरोप केले आहेत. नवजोत यांचा मुलगा नवनूर सिंग याने दिलेल्या माहितीनुसार, "अपघातानंतर त्याच्या वडिलांना मोठ्या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल किंवा एम्ससारख्या ठिकाणी नेण्याऐवजी त्यांना २० किमी अंतरावर असलेल्या खालगी रुग्णालयात नेण्यात आले, जिथे आवश्यक सुविधा उपलब्ध नव्हत्या. पालकांना रुग्णवाहिकेऐवजी डिलिव्हरी व्हॅनने नेण्यात आलं आणि योग्य उपचारांअभावी वडिलांचा मृत्यू झाला."
"आई-वडील गुरुद्वारा बंगला साहिब येथे जात होते, परंतु आई फोन उचलत नव्हती. यानंतर एका नातेवाईकाचा फोन आला, ज्याने सांगितलं की, पालकांचा भीषण अपघात झाला आहे आणि दोघांनाही उपचारासाठी जीटीबी नगरमधील न्यू लाईफ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. दुपारी १ ते १:३० च्या दरम्यान बीएमडब्ल्यू कार चालवणाऱ्या एका तरुणीने पालकांच्या बाईकला धडक दिल्याने हा अपघात झाला."
हृदयद्रावक! BMW ने घेतला भारत सरकारच्या मोठ्या अधिकाऱ्याचा जीव; नेमकं काय घडलं?
नवनूरने सांगितलं की, "वडिलांना अपघातस्थळापासून २० किमी अंतरावर असलेल्या रुग्णालयात नेण्यात आलं होतं आणि तिथे पुरेशा सुविधा किंवा आपत्कालीन व्यवस्था नव्हती. धौला कुआन परिसरात अनेक सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल आणि एम्स आहे, जर वडिलांना वेळेवर तिथे नेण्यात आलं असतं तर कदाचित माझ्या वडिलांचा जीव वाचला असता."
कुटुंबाने असाही आरोप केला आहे की, जखमींना रुग्णवाहिकेऐवजी डिलिव्हरी व्हॅनने रुग्णालयात नेण्यात आलं. जेव्हा नवजोत सिंग यांची पत्नी आई शुद्धीवर आली तेव्हा त्या व्हॅनच्या सीटवर होती आणि पती मागे बेशुद्ध अवस्थेत होते. रुग्णालयात पोहोचल्यानंतर नवजोत यांना मृत घोषित करण्यात आलं. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि तपास सुरू आहे. अपघातात सहभागी असलेली बीएमडब्ल्यू जप्त करण्यात आली आहे आणि अधिक चौकशी केली जात आहे.