नवऱ्याने चक्क विमानातच बायकोला सोडले
By Admin | Updated: December 20, 2015 00:10 IST2015-12-20T00:10:07+5:302015-12-20T00:10:07+5:30
हनिमून म्हणजे नवपरिणितांच्या जीवनातील नव्या पर्वाची सुरुवात. दोन जिवांच्या एकत्र येण्याचा काळ; पण लखनौमधील एका जोडप्यात मात्र या हनिमूनमध्येच एवढा मोठा राडा

नवऱ्याने चक्क विमानातच बायकोला सोडले
नवी दिल्ली : हनिमून म्हणजे नवपरिणितांच्या जीवनातील नव्या पर्वाची सुरुवात. दोन जिवांच्या एकत्र येण्याचा काळ; पण लखनौमधील एका जोडप्यात मात्र या हनिमूनमध्येच एवढा मोठा राडा झाला की, हनि गेला एकीकडे आणि मून राहिला एकटा, अशी परिस्थिती निर्माण झाली.
इंडिगो एअरलाईन्सच्या गोवा- कोलकाता- पाटणा- लखनौ- दिल्ली विमानातील प्रवाशांना हा विचित्र आणि दु:खद अनुभव आला.
लखनौमधील एक नवविवाहित जोडपे त्यांच्या मित्रमंडळींसह हनिमूनसाठी गोव्याला गेले होते. मधुचंद्राचा सुखद काळ संपवून हे दाम्पत्य परतत असताना विमानातच त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. हे भांडण एवढे विकोपाला गेले की, आपल्या बायकोवर जाम चिडलेला हा नवरा चक्क तिला विमानात एकटीला टाकून पळून गेला.
विमानातील कुठल्याही प्रवाशाला अशा प्रकारे प्रवासात मध्येच उतरण्याची परवानगी नसते. त्यामुळे एखादी व्यक्ती विमानातून अशी उतरून जात असेल, तर त्याला सुरक्षा अधिकारीसुद्धा दोषी आहेत, असे पाटणा विमानतळाचे संचालक आर.एस. लहोटिया यांनी सांगितले.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
पाटणा येथील घटना
पाटणा विमानतळावर टेक आॅफपूर्वी प्रवाशांची मोजणी केली असता एक प्रवासी कमी असल्याचे निदर्शनास आले. विमानातील अधिकाऱ्यांनी चौकशी केली तेव्हा सदर महिलेने आपला नवरा निघून गेला असल्याचे सांगितले आणि सर्वांना धक्काच बसला.