नौदलाच्या विमानाला गोव्याजवळ अपघात, दोनजण बेपत्ता
By Admin | Updated: March 25, 2015 09:23 IST2015-03-25T08:58:35+5:302015-03-25T09:23:18+5:30
- भारतीय नौदलाच्या डॉर्निअर विमानाला मंगळवारी रात्री गोव्याजवळ अपघात होऊन ते समुद्रात कोसळले असून दोनजण बेपत्ता आहेत.

नौदलाच्या विमानाला गोव्याजवळ अपघात, दोनजण बेपत्ता
ऑलाइन लोकमत
पणजी, दि. २५ - भारतीय नौदलाच्या डॉर्निअर विमानाला मंगळवारी रात्री गोव्याजवळ अपघात होऊन ते समुद्रात कोसळले आहे. विमानातील एका अधिका-याला वाचवण्यात यश आले असले तरी वैमानिक व आणखी एक अधिकारी अद्याप बेपत्ता आहेत. त्यांचा शोध सुरू आहे.
नौदलाच्या या विमानाने काल रात्री नियमित गस्तीसाठी उड्डाण केले होते. मात्र थोड्याच वेळात ते समुद्रात २५ नॉटिकल मैलावर कोसळले. काही मच्छिमारांनी विमानातील एका अधिका-याला वाचवले आणि उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र वैमानिक व आणखी एक अधिकारी अद्याप बेपत्ता आहे.
हा अपघात नेमाक कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.