निसर्गाचे वर्तन आदर्श - डॉ. हरम हुजूरपागेत विज्ञान मंडळाचे उद्घाटन

By Admin | Updated: July 13, 2015 16:07 IST2015-07-13T16:07:28+5:302015-07-13T16:07:28+5:30

पुणे : निसर्गाचे वर्तन हे आदर्श असते त्यामुळे आपण प्रत्येकाने त्याचे अनुकरण करणे गरजेचे आहे. असे मत विज्ञान अभ्यासिका डॉ. नंदा हरम यांनी व्यक्त केले. हुजूरपागा शाळेत विज्ञान मंडळ या उपक्रमाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या.

Nature's behavior ideal - Dr. Inauguration of Science Board in Harim Hujurpag | निसर्गाचे वर्तन आदर्श - डॉ. हरम हुजूरपागेत विज्ञान मंडळाचे उद्घाटन

निसर्गाचे वर्तन आदर्श - डॉ. हरम हुजूरपागेत विज्ञान मंडळाचे उद्घाटन

णे : निसर्गाचे वर्तन हे आदर्श असते त्यामुळे आपण प्रत्येकाने त्याचे अनुकरण करणे गरजेचे आहे. असे मत विज्ञान अभ्यासिका डॉ. नंदा हरम यांनी व्यक्त केले. हुजूरपागा शाळेत विज्ञान मंडळ या उपक्रमाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी डॉ. हरम म्हणाल्या, विज्ञानाच्या दृष्टीने ३ आर महत्त्वाचे असून रियूस, रिसायकल आणि रिड्यूस हा कानमंत्र समजून आपण वागले पाहीजे. तसेच त्यांनी विज्ञानातील शोध कसे लागतात, त्याचा संशोधक कशाप्रकारे अभ्यास करतात आणि या शोधांचा मानवी जीवनावर कशाप्रकारे परिणाम होतो हे विज्ञार्थिनींना समजावून सांगितले.
आंतरराष्ट्रीय प्रकाशवर्ष असल्याच्या पार्श्वभूमीवर सुधीर नारखेडे यांनी केलेल्या प्रयोगांचे प्रदर्शन शाळेत मांडण्यात आले आहे. शाळेतील १५०० विद्यार्थिनींनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला. या उपक्रमाची जबाबदारी संभाळणार्‍या विद्यार्थिनींना डॉ. हरम यांच्या हस्ते यावेळी नियुक्ती पत्रके देण्यात आली. अशप्रकारे विद्यार्थ्यांना शालेय स्तरापासूनच विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी यासाठी वर्षभर शाळेत निरनिराळ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचे शाळेच्या मुख्याध्यापिका अलका काकतकर यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमासाठी शाळेच्या उपमुख्याध्यापिका स्वाती कुलकर्णी, विज्ञान पर्यवेक्षिका मंगला वाघमोडे आणि सर्व विज्ञान शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षपद तनया गु˜े या विद्यार्थिनीने भूषविले तर सूत्रसंचालन ईशा जोशी हीने केले.


फोटो - सायली लॉगइनला हुजूरपागा नावाने सेव्ह आहे.

फोटो ओळ - विज्ञान मंडळाचे प्रदर्शन पहाताना मुख्याध्यापिका अलका काकतकर व विद्यार्थिनी

Web Title: Nature's behavior ideal - Dr. Inauguration of Science Board in Harim Hujurpag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.