आयुक्तांकडून जातीवाचक शिवीगाळ: 2 फेब्रुवारी रोजी सुनावणी
By Admin | Updated: January 23, 2015 23:06 IST2015-01-23T23:06:27+5:302015-01-23T23:06:27+5:30
सोलापूर : महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ़ प्रसाद मरेप्पा कुमार (वय 34, रा़ डॉक्टर कॉलनी, दाराशा दवाखाना) यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्यावर अँट्रॉसिटी अँक्टची खासगी फिर्याद दाखल झाली आह़े या प्रकरणाची 2 फे ब्रुवारी रोजी सुनावणी होत आह़े

आयुक्तांकडून जातीवाचक शिवीगाळ: 2 फेब्रुवारी रोजी सुनावणी
स लापूर : महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ़ प्रसाद मरेप्पा कुमार (वय 34, रा़ डॉक्टर कॉलनी, दाराशा दवाखाना) यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्यावर अँट्रॉसिटी अँक्टची खासगी फिर्याद दाखल झाली आह़े या प्रकरणाची 2 फे ब्रुवारी रोजी सुनावणी होत आह़ेजुलै 2013 मध्ये मनपा आयुक्तपदी गुडेवार रुजू झाल़े दरम्यान, प्रभारी आरोग्य अधिकारी शहाजी गायकवाड यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्याने त्यांच्या जागी डॉ़ कुमार यांची नियुक्ती करण्यात आली होती़ कंटेनर प्रकरणात याच काळात आयुक्तांचा आदेश डावलून नियमबा? वर्कऑर्डर देण्यास कुमार यांनी नकार दिला़ ‘तू काम नीट करीत नाहीस’ असे वारंवार सांगत कु मार यांना जातीवाचक बोलल़े 26 फेब्रुवारी 2014 रोजी कुमार यांनी पदाचा राजीनामा दिला़ आयुक्तांबरोबर डॉ़ कांतीलाल डागा यांनीदेखील त्रास द्यायला सुरुवात केली़ शासनाचा आदेश डावलून आयुक्तांनी रिक्त जागेवर डॉ़ डागा यांची नियुक्ती केली़ कंटेनर प्रकरणात जवळच्या व्यक्तीस वर्कऑर्डर दिली आणि मनपाचे 3 लाखांचे नुकसान झाल्याची खासगी फिर्याद डॉ़ कुमार यांनी अँड़ एम़ डी़ बिराजदार यांच्या मार्फत दाखल केली़ या प्रकरणाची सुनावणी 2 फेब्रुवारी रोजी होणार आह़े (प्रतिनिधी)