मूलनिवासी

By Admin | Updated: May 18, 2015 01:16 IST2015-05-18T01:16:18+5:302015-05-18T01:16:18+5:30

ब्राम्हणवादी व्यवस्थेमुळे पितृसत्ताक पध्दती

Native | मूलनिवासी

मूलनिवासी

राम्हणवादी व्यवस्थेमुळे पितृसत्ताक पध्दती
वामन मेश्राम यांचे मत : राष्ट्रीय मूलनिवासी अधिवेशन
पुणे : भारतात पूर्वी मातृसत्ताक पध्दतीची कुटुंब व्यवस्था होती. आजही नागालँग, मिझोराम या अदिवासी राज्यात मातृसत्ताक पध्दती आहे. मात्र, ब्राम्हणवादी व्यवस्थेमुळे पितृसत्ताक पध्दतीचा प्रचार झाला. या पितृसत्ताक पध्दतीमुळे महिला गुलाम झाल्या आहेत. या गुलामगिरीचा इतिहास समजून घेतल्याशिवाय स्वातंत्र्याचा मार्ग सापडणार नाही, असे मत बामसेफचे अध्यक्ष वामन मेश्राम यांनी आज व्यक्त केले.
राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघाच्या तिस-या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन रविवारी झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजनेच्या संचालक कविता सिंग, महिला संघाच्या अध्यक्षा सुजाता काळे, बामसेफच्या सदस्या कांचनलता लांजेवार, चारुबेन चौहान, हेमलता साठे, डॉ. बबिता उद्भव आदी उपस्थित होत्या. ब्राšाण्यवादी व्यवस्थेने देशात जात व वर्ण निर्माण झाले. अस्पृश्यतेमुळे आदिवासी समाजाचे विभाजन झाले. आपल्या देशाशिवाय ही व्यवस्था जगात कुठेही पहालया मिळत नाही. पितृसत्ताक पध्दतीमुळे महिलांना गुलामगिरीची सवय झाली आहे. आता गुलामगिरीतून सुटका होण्यासाठी संघर्षाशिवाय पर्याय नाही. त्यासाठी महिलांनी पुढाकार घेऊन एकत्रित संघर्ष करावा, असे आवाहन मेश्राम यांनी केले.
देशाला स्वातंत्र्य मिळून सहा दशके झाली. तरीही महिलांची गुलामगिरीतून सुटका झालेली नाही. पुरुषप्रधान संस्कृतीत महिला गुलाम असतील, तर देशाची प्रगती होणार नाही, असे मत डॉ. बबिता उद्भव यांनी व्यक्त केले. जाती व्यवस्थेने महिलांना गुलाम व शुद्र म्हटले आहे. परंतु, देशातील प्रत्येक क्रांतीमध्ये महिलांचा सहभाग आहे, असे कांचनलता लांजेवार यांनी सांगितले. एका बाजुला आपण विकसित देशाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. तरीही आज दलित व आदिवासी समाजातील महिलांवर अत्याचार होत आहेत. त्यामुळे आपल्याला कोणाचे संरक्षण मिळेल, यावर विसंबून राहून चालणार नाही. स्त्रियांना स्वत:ची लढाई स्वत:च करावी लागणार आहे, असे मत कविता सिंग यांनी व्यक्त केले.
----------------------------------

Web Title: Native

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.