शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

कामगारांचे आज देशव्यापी आंदोलन; राज्यातील सर्व संघटना सहभागी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2020 02:03 IST

केंद्रीय कामगार संघटना नेत्यांचे संयुक्त निवेदन देशाच्या नावे कोट्यवधी जनतेच्या सह्यांसह पाठविण्यात येणार

मुंबई : कामगारांच्या विविध प्रश्नावर देशांतील सर्व केंद्रीय कामगार संघटनांच्या वतीने रविवारी देशव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व संघटना या आंदोलनात सहभागी होणार आहेत.याबाबत कामगार संघटना कृती समितीचे सहनिमंत्रक विश्वास उटगी यांनी सांगितले की, कोरोनाचे सर्व नियम पाळून आंदोलन केले जाणार आहे. केंद्रीय कामगार संघटना नेत्यांचे संयुक्त निवेदन देशाच्या नावे कोट्यवधी जनतेच्या सह्यांसह पाठविण्यात येणार आहे. सर्व उद्योगांचे, संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगारांचे व अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचे प्रश्न या निवेदनात आहेत.सर्व कामगार संघटनांनी अग्रक्रमाने याला गती द्यावी. प्रत्येक जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी ९ आॅगस्ट रोजी शहीद स्मारक किंवा मध्यवर्ती चौकात कामगार संघटनांनी कोरोनाचे नियम पाळत निदर्शने व सत्याग्रह असे कार्यक्रम करावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे. ते पुढे म्हणाले की, ९ आॅगस्ट १९४२ रोजी महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली जनतेने ब्रिटिशांविरोधात छोडो भारत आंदोलन केले. मुंबईचे आॅगस्ट क्रांती मैदान हे चळवळीचे केंद्र होते. याच ठिकाणी ९ आॅगस्टला कोरोना व कायद्याच्या मर्यादेत मुंबईतील कामगार संघटना समन्वय करून मानवी साखळी करून मागण्यांचे फलक प्रदर्शित करतील़

टॅग्स :agitationआंदोलन