राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षांचा दौरा रद्द

By Admin | Updated: April 3, 2016 03:49 IST2016-04-02T23:55:54+5:302016-04-03T03:49:17+5:30

अहमदनगर : उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेत राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ याही शिंगणापुरात जाणार होत्या.

Nationalist Women's State President's visit canceled | राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षांचा दौरा रद्द

राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षांचा दौरा रद्द

अहमदनगर : उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेत राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ याही शिंगणापुरात जाणार होत्या. मात्र, शिंगणापूरमधील महिलांनी त्यांना संपर्क करुन न्यायालयाचा निर्णय आम्हाला बघू द्या. आम्हाला थोडा वेळ द्या अशी विनंती केल्याने वाघ यांनी आपला दौरा रद्द केला.
वाघ शनिवारी सकाळी येथे पोहोचल्या. दरम्यान, त्यांना देवस्थानचे विश्वस्त व कोणत्याही पक्षाशी संबंध नसलेल्या अथवा राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या स्थानिक महिलांनी संपर्क केला. महिलांना चौथऱ्यावर प्रवेश बंद ही वर्षानुवर्षाची परंपरा आहे. ती मानसिकता बदलण्यास आम्हाला वेळ लागेल, तो वेळ आम्हाला द्या. तुम्ही अशा पद्धतीने येथे आलात तर येथील कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. तुम्ही सन्मानाने येथे आल्या पाहिजेत, अशी आमची भूमिका आहे, असे या महिला म्हणाल्या. या विनंतीला मान देत वाघ यांनी पत्रकार परिषद घेऊन आपला दौरा रद्द केला. महिलांच्या विनंतीचा मान ठेवत आपण हा निर्णय घेतल्याचे त्या म्हणाल्या.(प्रतिनिधी)

Web Title: Nationalist Women's State President's visit canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.