युती सरकारच्या विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

By Admin | Updated: January 29, 2015 23:17 IST2015-01-29T23:17:07+5:302015-01-29T23:17:07+5:30

नागपूर : राज्यातील युती सरकारने सामान्य नागरिकांसोबत शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. आघाडी सरकारने गोरगरीब जनतेसाठी सुरू केलेल्या योजना बंद केल्या आहेत. निवडणूकीपूर्वी सरकारने दिलेल्या आश्वासनांची आठवण व्हावी म्हणून, सरकारचे डोळे उघडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस नागपूर शहर व ग्रामीणतर्फे ३ फेब्रुवारीला आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती माजी मंत्री अनिल देशमुख यांनी पत्रपरिषदेत दिली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात रिझर्व्ह बँक चौकात दुपारी २ वाजता आंदोलन करण्यात येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक प्रचारादरम्यान कापसाला उत्पादन खर्च व ५० टक्के नफा या आधारावर भाव देण्याची घोषणा केली होती. सरकारने केवळ ५० रुपये वाढ देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. सरकारने घोषित केलेल्या पॅकेज्

Nationalist movement against coalition government | युती सरकारच्या विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

युती सरकारच्या विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

गपूर : राज्यातील युती सरकारने सामान्य नागरिकांसोबत शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. आघाडी सरकारने गोरगरीब जनतेसाठी सुरू केलेल्या योजना बंद केल्या आहेत. निवडणूकीपूर्वी सरकारने दिलेल्या आश्वासनांची आठवण व्हावी म्हणून, सरकारचे डोळे उघडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस नागपूर शहर व ग्रामीणतर्फे ३ फेब्रुवारीला आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती माजी मंत्री अनिल देशमुख यांनी पत्रपरिषदेत दिली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात रिझर्व्ह बँक चौकात दुपारी २ वाजता आंदोलन करण्यात येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक प्रचारादरम्यान कापसाला उत्पादन खर्च व ५० टक्के नफा या आधारावर भाव देण्याची घोषणा केली होती. सरकारने केवळ ५० रुपये वाढ देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. सरकारने घोषित केलेल्या पॅकेजच्या नावाखालीसुद्धा शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. आघाडी सरकारच्या काळात एपीएल व केशरी कार्डधारकांना सवलतीच्या दरात धान्याचे वाटप होत होते. मात्र युती सरकारने नोव्हेंबरपासून धान्य वाटप बंद केले आहे. केरोसीनच्या कोट्यातही कपात केली आहे. सरकार सामान्य व गोरगरीब जनतेवर अन्याय करीत असल्याचा आरोप देशमुख यांनी केला. यावेळी आ. प्रकाश गजभिये, जिल्हाध्यक्ष बंडोपंत उमरकर, शब्बीर विद्रोही, अनिल अहिरकर, ईश्वर बाळाबुधे, प्रवीण पोटे आदी उपस्थित होते.

Web Title: Nationalist movement against coalition government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.