National Security Day: भारतीय सुरक्षा दलांबद्दलच्या 'या' गोष्टी माहीत आहेत का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2019 20:08 IST
सुरक्षा दलांमध्ये पोलीस, कमांडो, लष्कर, निम लष्करी दल या सर्वांचा समावेश होतो.
National Security Day: भारतीय सुरक्षा दलांबद्दलच्या 'या' गोष्टी माहीत आहेत का?
मुंबई: आजचा दिवस राष्ट्रीय सुरक्षा दिन म्हणून साजरा केला जातो. देशातील, देशाच्या सीमांवरील भागातील शांतता कायम राहावी, यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या सुरक्षा दलातील कर्मचाऱ्यांबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. सुरक्षा दलांमध्ये पोलीस, कमांडो, लष्कर, निम लष्करी दल या सर्वांचा समावेश सुरक्षा दलांमध्ये होतो. भारतीय सुरक्षा दलांबद्दलच्या महत्त्वाच्या गोष्टी-भारतीय सैन्यात तब्बल 13 लाख जवान आहेत. जगातलं सर्वात मोठं लष्कर भारताकडे आहे. 2017-18 या आर्थिक वर्षासाठी भारत सरकारनं सरक्षणासाठी 2.74 लाख कोटी रुपयांची तरतूद केली होती. 2013 मध्ये उत्तराखंडमध्ये महापूर आला होता. त्यावेळी भारतीय सैन्यानं ऑपरेशन मदत राबवलं होतं. या कामगिरीची जगानं दखल घेतली होती. ते जगातल्या सर्वात मोठ्या नागरी मदत कार्यापैकी एक होतं. देशाच्या राजकीय, आर्थिक क्षेत्राशी संबंधित सुरक्षेचे मुद्दे राष्ट्रीय सुरक्षा समितीकडून हाताळले जातात. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी 19 नोव्हेंबर 1998 रोजी या समितीची स्थापना केली. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आहेत. राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित मुद्द्यावर ते पंतप्रधानांना सल्ला देतात.
रॉ आणि आयबी या गुप्तचर संस्था राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या नेतृत्त्वाखाली काम करतात.