शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
3
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
4
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
5
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
6
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
7
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
9
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
10
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
11
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
12
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
14
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
15
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
16
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
17
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
18
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
19
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
20
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 

नाटकांचं ऑलिम्पिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2018 7:51 AM

जसं खेळांचं ऑलिम्पिक असतं तसंच हे नाटकांचं ऑलिम्पिक. थिएटर ऑलिम्पिक.

समीर शिवाजी दळवी

अर्थात, इथं नाटकानाटकांत स्पर्धा नाहीये, हे फक्त नाटकांचं एक स्नेहसंमेलन आहे. मात्र त्यामुळे देशाच्या एका कोपऱ्यात राहणाºया प्रेक्षकाला दुसऱ्या कोपऱ्यातलं नाटक पाहता येतंय.  निराशा इतकीच, की या स्रेहसंमेलनातलं ते नाटक ‘आजचं’ नाही ! १७ फेब्रुवारी ते ८ एप्रिलदरम्यान देशभरातल्या १६ शहरांत नॅशनल स्कूल ऑफ ड्रामातर्फे थिएटर ऑलिम्पिकचं आयोजन करण्यात आलं आहे.

 

नाटकांच्या संमेलनावर हा एक दृष्टिक्षेप..दिल्लीच्या राष्ट्रीय नाट्य विद्यालय अर्थात नॅशनल स्कूल आॅफ ड्रामातर्फे दिनांक १७ फेब्रुवारी ते ८ एप्रिल या कालावधीत, मुंबईसह देशभरातील सोळा शहरांत ‘आठव्या थिएटर ऑलिम्पिक’चं आयोजन करण्यात आलं आहे. एकाचवेळी संपूर्ण देशभरात भव्य प्रमाणात होणाºया या थिएटर आॅलिम्पिकमध्ये साडेचारशे नाट्यप्रयोग सादर होणार असून, त्यात वीस ते पंचवीस हजार कलाकारांचा सहभाग असणार आहे. इतका मोठा व्याप असलेल्या थिएटर ऑलिम्पिकचं यजमानपद भारताला म्हणजे आपल्या देशाला लाभणं, ही आपल्यासाठी नक्कीच अभिमानास्पद अशी बाब आहे.काय आहे हे थिएटर ऑलिम्पिक?क्रीडाक्षेत्राशी प्रत्यक्ष संबंध असणाºया आणि नसणाºयासुद्धा आपल्यापैकी बºयाचजणांना हे ठाऊकच असेल की, विविध खेळांचा समावेश असलेल्या महाकुंभाचं आयोजन दर चार वर्षांनी जगातल्या एका देशात केलं जातं. जगभरातील देशोदेशीचे क्रीडापटू या खेळांच्या कुंभमेळ्यात सहभागी होत असतात. वेगवेगळ्या स्पर्धा शर्यतीत आपलं कसब पणाला लावतात, आपल्या देशासाठी जास्तीत जास्त पदकं मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतात. खेळाडूंचा हा सगळा आटापिटा जास्तीत जास्त यश संपादन करण्यासाठी असला तरी सरतेशेवटी एक महत्त्वाची भावना या स्पर्धेमागे असते. ती म्हणजे खेळांच्या माध्यमातून जगातील देशांमधला एकोपा जपणं. एकमेकांचे विरोधी म्हणून खेळत असतानाच स्पर्धकांनी एकमेकांवर कुरघोडी न करता एकमेकांचं यश साजरं करत अंतिमत: खेळाचा आनंद लुटणं. खेळाच्या निमित्तानं जगभरातल्या क्रीडापटूंचे होणारं ते एक स्नेहसंमेलन असतं. अ गेट टुगेदर !.. अ‍ॅन ऑलिम्पिक ! अगदी तसंच स्नेहसंमेलन, तसंच गेट टुगेदर, तसंच ‘ऑलिम्पिक’ नाटकांचंसुद्धा होतंय. फरक असलाच तर तो इतकाच की इथं नाटकानाटकांत कुठलीही स्पर्धा नाहीय. जगभरातील देशोदेशीचे कलावंत आपली कलाकृती अत्यंत प्रभावीपणे प्रेक्षकांसमोर सादर करता यावी म्हणून आपलं कसब इथे पणाला लावताहेत.हे थिएटर ऑलिम्पिक म्हणजे जगभरात तसंच आपल्या देशात खेळल्या जाणाºया वेगवेगळ्या नाटकांचा, त्यांच्या प्रयोगांचा, विविध नाट्यशैलीचा परिचय इथल्या प्रेक्षकांना करून देणारा एक संगम आहे. इतकंच नव्हे तर या थिएटर ऑलिम्पिकमध्ये नाटकाशी निगडित चर्चा, परिसंवाद आणि नाटकाचा प्रयोग सादर झाल्यानंतर त्या नाटकाच्या दिग्दर्शकाबरोबर उपस्थित प्रेक्षकांचा थेट संवाद अशा विविध उपक्रमांचं आयोजनही करण्यात आले आहे. हे सगळं करण्याचा हेतू एकच. जगभरात पसरलेल्या, प्रत्यक्ष काम करत असलेल्या रंगकर्मीचं यानिमित्तानं एकत्र येणं, त्यांच्या नाट्यविचारांची, त्यांच्या नाट्यविषयक दृष्टिकोणांची एकमेकांत देवाणघेवाण होणं आणि सरतेशेवटी इथल्या प्रेक्षकांची नाटकाची जाण समृद्ध करणं. याअर्थाने, हे थिएटर आॅलिम्पिक म्हणजे नाटकाच्या चाहत्यांसाठी एक पर्वणीच म्हणूया.या आठव्या थिएटर ऑलिम्पिकच्या निमित्तानं अनेक दर्जेदार नाटकांचे प्रयोग प्रेक्षकांना पहायला मिळत आहेत. हे आॅलिम्पिक जरी देशभर होत असलं तरी मी इथे मुंबईत असल्यानं माझ्याजवळ इथं सादर होणाºया नाटकांची यादी आहे. या यादीत जी नाटकं आहेत त्यातील काही तर भारतीय रंगभूमीच्या इतिहासातील महत्त्वाची पानं आहेत. भारतीय रंगभूमीच्या आजवरच्या प्रवासातले महत्त्वाचे टप्पे दाखवणारी आहेत. वानगीदाखल उल्लेख करायचा झाला तर त्यात रामधारी सिंह दिनकरांचं ‘रश्मीरथ’ आहे, रवींद्रनाथ टागोरांचं ‘डाकघर’ आहे, विजय तेंडुलकरांचं ‘घाशीराम कोतवाल’ आहे, महेश एलकुंचवारांचं ‘सोनाटा’ आहे, मोलिएरच्या ‘तारतूफ’चा हिंदी अनुवाद आहे, वि.वा. शिरवाडकरलिखित सुप्रसिद्ध ‘नटसम्राट’ आहे, तसंच अगदी अलीकडचं स्नेहल देसाईचं ‘कोड मंत्र’देखील आहे. याशिवाय, देशपरदेशातून आलेली इतरही नवी-जुनी नाटकं आहेत, आदिवासी सादर करीत असलेलं पारंपरिक लोकनाट्य आहे, महाविद्यालयातून शिकणाºया विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या आणि शैक्षणिकउपक्रमांचे भाग असलेल्या नाटकांचे प्रयोगसुद्धा आहेत.या थिएटर ऑलिम्पिकचा सर्वात मोठा फायदा होणार हा की, देशपरदेशातल्या विविध आणि प्रसिद्ध नाट्यसंस्थांकडून सादर होणारी, त्या संस्थांतून काम करणाºया बुजुर्ग कलाकारांच्या अभिनयाने नटलेली, इथला सांस्कृतिक वारसा दाखवणारी आणि तरुण उदयोन्मुख कलाकारांच्या उत्साही कलाकृती एकाच महोत्सवात एका ठिकाणी पाहता येतील. एरवी ज्या नाटकांबद्दल इतरांकडून केवळ ऐकलेलंच असतं, ज्या नाटकांच्या केवळ छापील संहीताच वाचलेल्या असतात, त्या नाटकांचे रंगमंचावर सादर होणारे प्रयोग पहायला मिळणं नाहीतर कसं आणि कुठं शक्य झालं असतं? म्हणूनच थिएटर ऑलिम्पिकचं इतक्या भव्य प्रमाणावर आयोजन करणारे राष्ट्रीय नाट्य विद्यालय आणि त्याचे विद्यमान संचालक प्रा. वामन केंद्रे हे निश्चितच अभिनंदनास पात्र ठरतात. हे शिवधनुष्य पेलणं म्हणजे साधी गोष्ट नव्हतीच.हे थिएटर ऑलिम्पिक आयोजित करत असताना राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचं त्यामागील ध्येयधोरणसुद्धा लक्षात घेण्यासारखं आहे. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे, मुंबईसह देशभरातील सोळा शहरांत या ऑलिम्पिकचं आयोजन करण्यात आलं आहे. नवी दिल्ली, अहमदाबाद, कोलकाता, भोपाळ, पाटणा ही त्यापैकी काही महत्त्वाची शहरं. भारताच्या इतर शहरांच्या तुलनेत वर सांगितलेल्या ठिकाणी नाट्यसंस्कृती आणि नाट्यचळवळ अधिक चांगल्या प्रकारे रु जलेली असल्यामुळे ही ठिकाणं ऑलिम्पिकसाठी निवडली गेलीत. परंतु, त्याहीपलीकडे जाऊन एक महत्त्वाचा हेतू यातून साधला गेलाय. तो म्हणजे, देशभरातल्या वेगवेगळ्या नाटकांच्या प्रयोगांचं सादरीकरण अशाप्रकारे आखले गेलेय की, देशाच्या एका कोपºयात राहणाºया प्रेक्षकांना दुसऱ्या कोपºयात होणारी नाटकं सहज पाहता येतील. माझ्यासारख्या मुंबईत राहणाºया प्रेक्षकांसमोर देशातील विविध भागात होणारी नाटकं सादर केली जात आहेत, तर नवी दिल्ली किंवा कोलकाता किंवा भोपाळ किंवा अहमदाबादसारख्या शहरात मुंबईत होणारी नाटके सादर होत आहेत. देशांतर्गत तसेच परदेशात खेळली गेलेली महत्त्वाची नाटकं भारतभर विखुरलेल्या प्रेक्षकांना एकाच महोत्सवात पाहण्याची सुवर्णसंधी यानिमित्तानं मिळाली आहे. देशपरदेशातील रंगभूमीवर सद्यकाळी कोणत्या प्रकारची नाटकं होत आहेत, कुठले प्रवाह रंगभूमीवर आपला प्रभाव टाकून आहेत, याचा एक साधारणता अंदाज या थिएटर आॅलिम्पिकच्या माध्यमातून प्रेक्षकांना येऊ शकेल.असं जरी असलं तरी कमतरता म्हणा किंवा माझं वैयक्तिक मत म्हणा; पण हे थिएटर ऑलिम्पिक आजचं नाटक दाखवण्यात कुठेतरी कमी पडतंय, असं प्रामाणिकपणे वाटतं. ऑलिम्पिकमध्ये सादर होणाऱ्या नाटकांवर एक नजर टाकली तर मला काय म्हणायचंय ते जास्त स्पष्ट व्हावं.उदाहरणादाखल घाशीराम कोतवाल घ्या किंवा नटसम्राट घ्या, कोर्टमार्शल घ्या किंवा डाकघर घ्या. नाटक म्हणून त्यांची महती कितीही मोठी असली, किंबहुना तशी ती आहेच, आजच्या नाटकवाल्यांना ती पुन्हा करून पहावीशी वाटत असली तरी ती ‘आजची’ नाटकं नाहीत. एकदा करून पाहिलेलं नाटक पुन्हा करून पहावं (रिवायवल) म्हणून, पुनर्प्रत्ययातून मिळणाºया आनंदासाठी केलेली नाटकं, थिएटर ऑलिम्पिकसारख्या महत्त्वाच्या आणि समकालीन (आजचे प्रश्न हाताळणाºया) नाटकांच्या प्रयोगांची अपेक्षा असलेल्या महोत्सवात सादर करून काय हशील? महोत्सवात सादर होणाºया नाटकांची निवड करणाºया आयोजकांच्या समितीने थोडंसं अधिक लक्ष घालून ‘आजची समस्या’, ‘आजचे प्रश्न’ हाताळणारे नाटक या थिएटर ऑलिम्पिकसाठी निवडलं असतं तर अशा आॅलिम्पिकचं औचित्य अधिक ठळकपणे जाणवलं असतं. अर्थात, ही केवळ एक माफक अपेक्षा आहे. त्यापलीकडे, इतक्या मोठ्या प्रमाणात नाट्यकर्मींच्या एका भव्य गेट टुगेदरचं विचारांच्या देवाणघेवाणीला व्यासपीठ मिळवून देणाºया स्नेहसंमेलनाचं, एका थिएटर ऑलिंपिकचं आयोजन भारतात केलं जातं आहे, हेही नसे थोडके.

(लेखक ख्यातनाम अभिनेते आहेत.)sameerd65@gmail.com 

टॅग्स :Theatreनाटक