राष्ट्रीय महालोक अदालत आज
By Admin | Updated: December 12, 2014 23:49 IST2014-12-12T23:49:16+5:302014-12-12T23:49:16+5:30
३१ हजार प्रकरणांचा होणार निपटारा

राष्ट्रीय महालोक अदालत आज
३ हजार प्रकरणांचा होणार निपटाराआज राष्ट्रीय महालोक अदालतनागपूर : जिल्हा न्यायालयात उद्या होणाऱ्या राष्ट्रीय महालोक अदालतीपुढे ३१ हजार प्रकरणे निपटाऱ्यासाठी ठेवली जाणार आहेत. ही माहिती जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचे सचिव किशोर जयस्वाल यांनी दिली. राष्ट्रीय विधिक सेवा प्राधिकरण, राज्य विधीसेवा प्राधिकरण आणि जिल्हा विधीसेवा प्राधिकरण्या वतीने या महालोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. विविध प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी ९४ पॅनल तयार करण्यात आले आहे. अर्थात ९४ न्यायालयांमध्ये लोक अदालतीचे काम चालणार आहे. महालोक अदालतीपुढे दाखल होणाऱ्या प्रकरणांमध्ये काही प्रकरणे विशेष मोहिमेद्वारे दाखल झालेली आहेत. राष्ट्रीय महालोक अदालतीपुढे येणाऱ्या प्रकरणांमध्ये समझोतायोग्य फौजदारी प्रकरणे, परक्राम्य लेखा अधिनियमाच्या कलम १३८ (चेक बाऊन्स) ची प्रकरणे, मोटार अपघात दावा प्राधिकरणातील प्रकरणे, कौटुंबिक न्यायालयीन प्रकरणे, कामगार वाद प्रकरणे, भूसंपादन प्रकरणे, भाडेसंबंधी, बँक, पुनर्प्राप्ती प्रकरणे, वहिवाट दावे, डीआरटी प्रकरणे, महसूल प्रकरणे, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेसंबंधी प्रकरणे, वीज, पाणी बील आणि चोरीसंबंधी प्रकरणे, आयकर, सेवाकर आणि अप्रत्यक्ष करासंबंधी प्रकरणे, नोकरीसंबंधी प्रकरणे, वन कायद्याची प्रकरणे, सैन्य छावणी मंडळाची प्रकरणे, रेल्वे दावे, आपदा नुकसान भरपाई आणि किरकोळ अपिलांचा समावेश आहे. पक्षकारांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश किशोर सोनवणे यांनी केले.