राष्ट्रीय- आतील पान महत्वाचे

By Admin | Updated: January 23, 2015 01:05 IST2015-01-23T01:05:23+5:302015-01-23T01:05:23+5:30

विदेशात नोकरीचे आमिष

National- Inner Home Important | राष्ट्रीय- आतील पान महत्वाचे

राष्ट्रीय- आतील पान महत्वाचे

देशात नोकरीचे आमिष
पाच ठगांना अटक
लखनौ- विदेशात नोकरीचे आमिष देऊन जवळपास एक हजार बेरोजगारांची २५ कोटी रुपयांनी फसवणूक करणाऱ्या पाच ठगांना पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती लखनौचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक यशस्वी यादव यांनी गुरुवारी दिली.

शाळेची इमारत कोसळली
बालक ठार
लखीमपूर- उत्तर प्रदेशच्या लखीमपूरमध्ये परसिया गावात बुधवारी एका प्राथमिक शाळेची इमारत कोसळल्याने एका १० वर्षीय बालकाचा मृत्यू झाला तर आणखी एक जखमी झाला. विशेष म्हणजे कडाक्याच्या थंडीमुळे २१ जानेवारीपर्यंत शाळा बंद असताना ही मुले तेथे पोहोचली कशी? असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.

एकाच कुटुंबातील पाच जणांना स्वाईन फ्लू
लखनौ- संजय गांधी पदव्युत्तर आयुर्विज्ञान संस्थेत कार्यरत एका कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील पाच जणांना स्वाईन फ्लू झाला असल्याचे उघडकीस आले आहे. सरकारी सूत्रांनी गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार रेडिओथेपरी विभागात कार्यरत बिलाल सईद यांना प्रथम लागण झाली. त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील इतर चार सदस्य स्वाईन फ्लूच्या विळख्यात सापडले.

आई रागवली म्हणून आत्महत्या
कानपूर- अकराव्या वर्गात शिकणाऱ्या एका मुलीने आई रागवल्याच्या कारणावरून गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शहरात बुधवारी रात्री घडली. पोलीस या प्रकरणाची चौकशी करीत आहेत.

११५ किलो गांजा जप्त
बेगुसराय- एका बोलेरो जीपमधून पोलिसांनी बुधवारी रात्री ११५ किलो गांजा जप्त केला. झिरोमाईल ठाण्याचे प्रभारी अजयकुमार यांनी गुरुवारी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, राष्ट्रीय महामार्गावर उभ्या असलेल्या जीपची तपासणी केली असता हे मादकपदार्थ सापडले.

सेवानिवृत्त मुख्य अभियंत्याच्या घरावर धाड
ग्वाल्हेर- लोकायुक्त पोलिसांनी गुरुवारी सकाळी जल संसाधन विभागाचे सेवानिवृत्त मुख्य अभियंता जी.एस. श्रीवास्तव यांच्या बळवंतनगर येथील घरावर छापा घालून बेहिशेबी मालमत्तेसंदर्भातील दस्तावेज जप्त केले. लोकायुक्त पोलीस अधीक्षक संतोषसिंग यांनी ही माहिती दिली.

Web Title: National- Inner Home Important

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.