राष्ट्रीय महत्वाचे- आतील पान

By Admin | Updated: February 18, 2015 00:12 IST2015-02-18T00:12:58+5:302015-02-18T00:12:58+5:30

बस दरीत कोसळून ९ ठार, २९ जखमी

National Important - Inner Home | राष्ट्रीय महत्वाचे- आतील पान

राष्ट्रीय महत्वाचे- आतील पान

दरीत कोसळून ९ ठार, २९ जखमी
धार (म.प्र.) - धार जिल्ह्यात सोमवारी रात्री एक खासगी बस ३०० फूट खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात तीन महिलांसह ९ प्रवासी ठार तर अन्य २९ जखमी झाले. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक राजेश हिंगणकर यांनी मंगळवारी दिली. अपघातग्रस्त बस इंदूर येथून राजस्थानच्या गलियाकोट येथे जात होती.

केदारनाथचे कपाट २४ एप्रिलला उघडणार
गोपेश्वर - हिमालयाच्या उंच पहाडांवर वसलेले भगवान शिवाचे मंदिर केदारनाथचे कपाट यावर्षी २४ एप्रिलला भाविकांसाठी खुले करण्यात येईल. श्री बद्रीनाथ केदारनाथ मंदिर समितीचे विशेष कार्याधिकारी व्ही.डी. सिंग यांनी ही माहिती दिली. शिवरात्रीच्या पावनपर्वावर उखीमठाच्या ओंकारेश्वर मंदिरात केदारनाथ मंदिराचे कपाट उघडण्यासाठी विधिवत मुहूर्त काढण्यात आला.

बसपा नेत्याची हकालपट्टी
मुजफ्फरनगर - बसपाच्या एका स्थानिक नेत्याची पक्षविरोधी कारवाया केल्याच्या आरोपानंतर पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. बसपाचे राष्ट्रीय महासचिव नसीमुद्दीन सिद्दीकी यांनी मंगळवारी याबाबत माहिती देताना सांगितले की, राजाराम ताराचंद शास्त्री हे पक्षविरोधी कारवाया करीत असल्याचे निदर्शनास आले होते.

काश्मीर खोऱ्यात पाऊस, गुलमर्गमध्ये हिमवर्षाव
श्रीनगर - काश्मीरमध्ये मंगळवारी दुसऱ्या दिवशी सतत पाऊस सुरू होता. तर स्किईंगसाठी प्रसिद्ध गुलमर्गमध्ये पुन्हा हिमवर्षाव झाला. हवामान विभागाच्या सांगण्यानुसार २४ फेब्रुवारीपर्यंत हीच स्थिती कायम राहील. गुलमर्गमध्ये रात्री १२ इंच हिमवर्षाव झाला.

त्यागी हत्याकांडात पोलिसही सहभागी
मुजफ्फरनगर - न्यायालय कक्षातील हल्ल्यात मारला गेलेला गँगस्टर विक्की त्यागी याच्या कुटुंबीयांनी याप्रकरणी पोलिसात तक्रार नोंदविली असून, पोलीस उपअधीक्षकासह एकूण १० लोकांवर हत्येत सहभागाचा संशय व्यक्त केला आहे. पोलीस कोठडीत असतानाच त्यागीला मारण्याची धमकी देण्यात आली होती, असे तक्रारीत नमूद आहे.

झोपडीला आग लागून बहीण-भावाचा अंत
जयपूर - जयपूर जिल्ह्यातील बस्सी पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या बडवाली ढाणी गुढामीणामध्ये मंगळवारी रात्री झोपडीला आग लागल्याने १३ वर्षीय युवराज आणि त्याच्या बहिणीचा अंत झाला.

Web Title: National Important - Inner Home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.