शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महत्वाचे- आतील पान

By admin | Updated: February 18, 2015 00:12 IST

बस दरीत कोसळून ९ ठार, २९ जखमी

बस दरीत कोसळून ९ ठार, २९ जखमी
धार (म.प्र.) - धार जिल्ह्यात सोमवारी रात्री खासगी बस ३०० फूट खोल दरीत कोसळून तीन महिलांसह ९ प्रवासी ठार तर अन्य २९ जखमी झाले. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक राजेश हिंगणकर यांनी मंगळवारी दिली. अपघातग्रस्त बस इंदूर येथून राजस्थानच्या गलियाकोट येथे जात होती.
केदारनाथचे दार २४ एप्रिलला उघडणार
गोपेश्वर - हिमालयाच्या उंच पहाडांवर वसलेले भगवान शिवाचे मंदिर केदारनाथचे कपाट यावर्षी २४ एप्रिलला भाविकांसाठी खुले करण्यात येईल. श्री बद्रीनाथ केदारनाथ मंदिर समितीचे विशेष कार्याधिकारी व्ही.डी. सिंग यांनी ही माहिती दिली. शिवरात्रीच्या पावनपर्वावर उखीमठाच्या ओंकारेश्वर मंदिरात केदारनाथ मंदिराचे कपाट उघडण्यासाठी विधिवत मुहूर्त काढण्यात आला.
बसपा नेत्याची हकालपट्टी
मुजफ्फरनगर - बसपाच्या एका स्थानिक नेत्याची पक्षविरोधी कारवाया केल्याच्या आरोपानंतर पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. बसपाचे राष्ट्रीय महासचिव नसीमुद्दीन सिद्दीकी यांनी मंगळवारी याबाबत माहिती देताना सांगितले की, राजाराम ताराचंद शास्त्री हे पक्षविरोधी कारवाया करीत असल्याचे निदर्शनास आले होते.
काश्मीर खोर्‍यात पाऊस, गुलमर्गमध्ये हिमवर्षाव
श्रीनगर - काश्मीरमध्ये मंगळवारी दुसर्‍या दिवशी सतत पाऊस सुरू होता तर स्किईंगसाठी प्रसिद्ध गुलमर्गमध्ये पुन्हा हिमवर्षाव झाला. हवामान विभागाच्या सांगण्यानुसार २४ फेब्रुवारीपर्यंत हीच स्थिती कायम राहील. गुलमर्गमध्ये रात्री १२ इंच हिमवर्षाव झाला.
त्यागी हत्याकांडात पोलिसही सहभागी
मुजफ्फरनगर - न्यायालय कक्षातील हल्ल्यात मारला गेलेला गँगस्टर विक्की त्यागी याच्या कुटुंबीयांनी याप्रकरणी पोलिसात तक्रार नोंदविली असून, पोलीस उपअधीक्षकासह एकूण १० लोकांवर हत्येत सहभागाचा संशय व्यक्त केला आहे. पोलीस कोठडीत असतानाच त्यागीला मारण्याची धमकी देण्यात आली होती, असे तक्रारीत नमूद आहे.
झोपडीला आग लागून बहीण-भावाचा अंत
जयपूर - जयपूर जिल्ह्यातील बस्सी पोलीस स्टेशनअंतर्गत येणार्‍या बडवाली ढाणी गुढामीणामध्ये मंगळवारी रात्री झोपडीला आग लागल्याने १३ वर्षीय युवराज आणि त्याच्या बहिणीचा अंत झाला.