राष्ट्रीय महत्वाचे- आतील पान

By Admin | Updated: February 13, 2015 23:11 IST2015-02-13T23:11:07+5:302015-02-13T23:11:07+5:30

आसाममध्ये ग्रेनेड स्फोटात दोन ठार

National Important - Inner Home | राष्ट्रीय महत्वाचे- आतील पान

राष्ट्रीय महत्वाचे- आतील पान

ाममध्ये ग्रेनेड स्फोटात दोन ठार
श्विसागर- आसामच्या शिवसागर जिल्ह्यात सिपोनमध्ये शुक्रवारी एका ग्रेनेड हल्ल्यात दोन जण ठार झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सायकलवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी प्रसिद्ध उद्योगपती वीरेन अग्रवाल यांच्या जे.पी. रोडस्थित घरावर हा हल्ला केला. यात वीरेन यांचे लहान बंधू सीतू आणि वाहनचालक दिबेश्वर भूया मृत्युमुखी पडले.

हॉटेलला लागलेल्या आगीत तिघे जळाले
अलवर- नीमरानामध्ये शुक्रवारी पहाटे एका हॉटेलला लागलेल्या आगीत तेथे वास्तव्याला असलेल्या तीन पर्यटकांचा मृत्यू झाला. १६ लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले असून यात काही विदेशी पर्यटकही आहेत. आग नियंत्रणात आली आहे.

गरोदर महिलेवर बलात्कार करणाऱ्या ठाणेदारास अटक
बागपत- उत्तर प्रदेशच्या बागपत जिल्ह्यात बडौत क्षेत्रात एका गरोदर महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपात ठाणेदार हरेंद्र याला शुक्रवारी अटक करण्यात आली. त्याच्या आणखी एका साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत.

विक्षिप्त युवकाने वडिलांची केली कुऱ्हाडीने हत्या
बहराईच- घरगुती भांडणातून एका विक्षिप्त युवकाने स्वत:च्या वडिलांची कुऱ्हाडीने हत्या केल्याची घटना उत्तर प्रदेशच्या बहराईचला लागून असलेल्या श्रावस्ती जिल्ह्यात भिनगा भागात मूर्तीहा गावात घडली. अनिल नामक आरोपी मुलास नंतर गावकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या सुपूर्द केले.

अपहरणप्रकरणी दोन पोलीस अधिकाऱ्यांना न्यायालयीन कोठडी
मेरठ- स्थानिक न्यायालयाने एका पाच वर्षे जुन्या अपहरणप्रकरणात दोन पोलीस अधिकाऱ्यांचा जामीन फेटाळून १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. विशेष मुख्य न्यायदंडाधिकारी एम.पी. सिंग यांनी गुरुवारी हा निर्णय दिला.

मुलायमसिंग यांचे सोनिया गांधींना लग्नाचे निमंत्रण
नवी दिल्ली- समाजवादी पार्टीचे प्रमुख मुलायमसिंग यादव यांनी त्यांचे नातू प्रतापसिंग यादव यांच्या २६ फेब्रुवारीला होणाऱ्या विवाहासाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना आमंत्रित केले आहे.

मद्यप्राशन करून गाडी चालविणाऱ्यास पाच दिवसांची कैद
नवी दिल्ली- येथील सत्र न्यायालयाने नवीनकुमार नामक एका इसमास मद्यप्राशन करून गाडी चालविल्याबद्दल पाच दिवस कैदेची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश वीरेंद्रकुमार बन्सल यांनी उपरोक्त निर्णय देताना आरोपीने केवळ त्याचाच नाहीतर इतरांचाही जीव धोक्यात घातला होता असे नमूद केले आहे.

आयटीबीपीचे जवान नक्षलग्रस्त भागातील मुलांना देताहेत शिक्षण
रायपूर- छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त राजनांदगाव जिल्ह्यात भारत तिबेट सीमा पोलिसांचे जवान (आयटीबीपी) नक्षल्यांसोबत संघर्ष करीत असतानाच येथील मुलांना शिक्षणही देत आहेत. या भागात शिक्षणाबाबत जागरूकता निर्माण करण्याचेही कार्य त्यांनी हाती घेतले आहे.

Web Title: National Important - Inner Home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.