राष्ट्रीय महत्वाचे- आतील पान

By Admin | Updated: February 13, 2015 00:38 IST2015-02-13T00:38:09+5:302015-02-13T00:38:09+5:30

पंतप्रधानांची दयानंद सरस्वती यांना श्रद्धांजली

National Important - Inner Home | राष्ट्रीय महत्वाचे- आतील पान

राष्ट्रीय महत्वाचे- आतील पान

तप्रधानांची दयानंद सरस्वती यांना श्रद्धांजली
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्य समाजाचे संस्थापक दयानंद सरस्वती यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. समाज सुधारणा आणि शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान उल्लेखनीय होते. विशेषत: समाज सुधारणेच्या कार्यामुळे ते त्यांच्या काळाच्या पुढे निघून गेले होते, अशी भावना पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केली.

राजस्थानात स्वाईन फ्लूचा कहर
मृतांची संख्या ११८
जयपूर- राजस्थानात स्वाईन फ्लूचा कहर सुरूच असून गेल्या २४ तासात एका विदेशी पर्यटकासह नऊजण मृत्युमुखी पडले. यासोबतच यावर्षी स्वाईन फ्लूने मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या ११८ झाली आहे. राजस्थान आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने गुरुवारी ही माहिती दिली.

पश्चिम मिदनापुरात हत्ती मृतावस्थेत आढळला
मिदनापूर- पश्चिम मिदनापूर जिल्ह्याच्या थुरिया गावात गावकऱ्यांना बुधवारी सकाळी एका हत्तीचा मृतदेह आढळल्यानंतर त्यांनी वन विभागाला याबाबत सूचना दिली. वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी हा मृतदेह ताब्यात घेतला आहे.

रागावणाऱ्या शिक्षकाला विद्यार्थ्याने चाकूने भोसकले
इम्फाल- मणिपुरात एका बारावीत शिकणाऱ्या मुलाने त्याला महाविद्यालय परिसरात मद्यप्राशन केले म्हणून फटकारणाऱ्या शिक्षकाला चाकूने भोसकले. पोलीस अधिकाऱ्यांनी गुरुवारी या घटनेची माहिती देताना सांगितले की, मंगळवारी लिवा सारेईस्थित जवाहर नवोदय विद्यालय परिसरात हा प्रकार घडला. जखमी शिक्षकाची प्रकृती गंभीर आहे.

पोलिसांवर हल्लाप्रकरणी सहा दोषी
मुजफ्फरनगर- एका स्थानिक न्यायालयाने पोलीस दलावर हल्ला करून शिपायाची हत्या केल्याप्रकरणी दोन महिलांसह एकाच कुटुंबातील सहा जणांना दोषी ठरविले आहे. एका प्रकरणातील आरोपी मनोजची पोलिसांच्या तावडीतून सुटका करण्याकरिता त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांवर हल्ला केला होता.

श्रीनगरमध्ये जनजीवन सामान्य
श्रीनगर- तीन दिवसांच्या निर्बंधांनंतर गुरुवारी श्रीनगर आणि खोऱ्यातील जनजीवन सामान्य राहिले. तर पोलीस गोळीबारात युवकाच्या मृत्यूप्रकरणी बारामुल्ला जिल्ह्याच्या पलहालन क्षेत्रात अजूनही बंदी कायम आहे. संसद हल्ल्यातील आरोपी मोहम्मद अफजल गुरू आणि जेकेएलएफचे संस्थापक मोहम्मद मकबुल भट यांच्या मृत्युदिनानिमित्त फुटीरवादी गटांनी दोन दिवस बंदचे आवाहन केले होते.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री तेलंगणाच्या दौऱ्यावर
हैदराबाद- आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलगू देसम पार्टीचे अध्यक्ष एन. चंद्राबाबू नायडू यांनी गुरुवारी तेलंगणाच्या वारंगल जिल्ह्यातून त्यांच्या एक दिवसीय दौऱ्यास प्रारंभ केला. स्वतंत्र राज्याच्या स्थापनेनंतरचा त्यांचा हा पहिलाच दौरा आहे.

एसपीजी महानिरीक्षक श्रीवास्तव यांना मुदतवाढ
नवी दिल्ली- भारतीय पोलीस सेवेतील वरिष्ठ अधिकारी विवेक श्रीवास्तव यांचा विशेष सुरक्षा गट (एसपीजी) महानिरीक्षक पदाचा कार्यकाळ पुढील ७ ऑक्टोबरपर्यत वाढविण्यात आला आहे. श्रीवास्तव हे १९८९ च्या गुजरात कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत.

Web Title: National Important - Inner Home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.