राष्ट्रीय महत्वाचे-आतील पान

By Admin | Updated: February 20, 2015 01:10 IST2015-02-20T01:10:27+5:302015-02-20T01:10:27+5:30

मणिपुरात बॉम्बस्फोटात सात जखमी

National Important-In-Home Page | राष्ट्रीय महत्वाचे-आतील पान

राष्ट्रीय महत्वाचे-आतील पान

िपुरात बॉम्बस्फोटात सात जखमी
इम्फाल- मणिपूरच्या मुख्य बाजार परिसरात बुधवारी सायंकाळी झालेल्या एका बॉम्बस्फोटात चार पोलीस कर्मचार्‍यांसह सात जण जखमी झाले. बॉम्ब पेरला असल्याची सूचना पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने तपास केला असता एक संशयास्पद बॅग मिळाली. शिपायाने ती बॅग नांबुल नदीत फेकण्याचा प्रयत्न केला असता स्फोट झाला.
नक्षल हल्ल्यात जवान शहीद
रायपूर- छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त दंतेवाडा जिल्ह्यात गादीरास पोलीस स्टेशनअंतर्गत दूधीरास गावाशेजारील जंगलात नक्षल्यांनी गुरुवारी पोलीस दलावर केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद झाला. वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी या घटनेची माहिती देताना सांगितले की, हे पोलीस दल गस्त घालण्यासाठी रवाना झाले होते. पोलिसांनी प्रत्युत्तरात कारवाई केल्यानंतर नक्षल्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.
खोर्‍यात पाऊसधारा आणि बर्फवृष्टी
श्रीनगर- काश्मीरमध्ये पर्यटकांचे आवडीचे ठिकाण असलेल्या प्रसिद्ध गुलमर्ग आणि पहलगाममध्ये गुरुवारी पुन्हा बर्फवृष्टी झाली तर खोर्‍याच्या इतर भागात सतत चौथ्या दिवशी पाऊस सुरूच होता. हवामान खात्याने पुढील आठवड्यापर्यत असेच वातावरण राहील,असा अंदाज वर्तविला आहे.
बसपा सदस्यांचे उत्तर प्रदेशात सभात्याग
लखनौ- उत्तर प्रदेशातील वाढत्या गुन्हेगारीच्या मुद्यावर प्रश्नोत्तराचा तास स्थगित करून चर्चा घेतली जावी या मागणीवरून बहुजन समाज पार्टीच्या सदस्यांनी गुरुवारी विधानसभेत सभात्याग केला. सभागृहाचे कामकाज सुरु होताच विरोधी पक्ष नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी उपरोक्त मागणी केली होती.
स्वामी अग्निवेश यांची रेल्वे अपघातप्रकरणी मागणी
नवी दिल्ली- सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश यांनी देशातील रेल्वेच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करुन विविध रेल्वे अपघातांचे चौकशी अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे. पंतप्रधानांच्या नावे खुल्या पत्रात त्यांनी वाढत्या रेल्वे अपघातांकडे लक्ष वेधले आहे.
पंतप्रधानांच्या अरुणाचल दौर्‍यासाठी कडेकोट सुरक्षा बंदोबस्त
इटानगर- पंतप्रधान नरेंद्र मोदी अरुणाचल प्रदेशच्या २९ व्या स्थापना दिनानिमत्त आयोजित समारंभात सहभागी होण्यासाठी शुक्रवारी राज्याच्या दौर्‍यावर येत आहेत. त्याअनुषंगाने सुरक्षा बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
केजरीवालांच्या जनता दरबारात अपंगांच्या समस्यांचा उहापोह
गाझियाबाद- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी त्यांच्या जनता दरबारात विकलांग नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
श्रीलंकेच्या नौदलाने नावेतील उपकरणे केली नष्ट
रामेश्वरम(तामिळनाडू)- श्रीलंकेच्या नौदलाने गुरुवारी मन्नारच्या खोर्‍यात एका नावेतील जीपीएस आणि मासोळ्यांचा शोध घेणारे उपकरण गुरुवारी नष्ट केले. या नावेत सहा मच्छीमार होते. अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री उशिरा रामेश्वरममधून रवाना होणार्‍या ३,००० लोकांच्या समूहात त्यांचा समावेश होता.
सौर यंत्राची तोडफोड करणार्‍या तिघांना अटक
जैसलमेर- जैसलमेर जिल्ह्यातील पोखरण पोलीस स्टेशनअंतर्गत एका सौर यंत्राची तोडफोड आणि हवेत गोळीबार केल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांना गुरुवारी अटक केली. पोलीस उपअधिक्षक धीमाराम बिश्नोई यांनी ही माहिती दिली.

Web Title: National Important-In-Home Page

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.