राष्ट्रीय : महत्त्वाचे

By Admin | Updated: February 15, 2015 22:36 IST2015-02-15T22:36:26+5:302015-02-15T22:36:26+5:30

राष्ट्रीय-महत्त्वाचे

National: Important | राष्ट्रीय : महत्त्वाचे

राष्ट्रीय : महत्त्वाचे

ष्ट्रीय-महत्त्वाचे
विजेच्या धक्क्याने दोन हत्तींचा मृत्यू
सीधी : मध्य प्रदेशच्या सीधी जिल्ह्यातील बघवारी गावात शेतात सिंचनासाठी लावण्यात आलेल्या वीज पंपाच्या जिवंत तारेचा स्पर्श होऊन दोन हत्तींचा मृत्यू झाला. शुक्रवारी मध्यरात्री हत्तींचा कळप जंगलातून जात असताना तो मध्य प्रदेशची सीमा ओलांडून छत्तीसगडच्या सीमेत दाखल झाला. तेथे एका शेतात वीज पंप लावला होता. त्याच्या तारेला स्पर्श झाल्याने दोन हत्ती दगावले.
बलात्कार पीडितेचा आत्महत्येचा प्रयत्न
मुजफ्फरनगर : उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगर जिल्ह्यातील जानसठ येथे बलात्कारपीडित तरुणीने गंगा कालव्यात उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही २१ वर्षीय तरुणी शनिवारी सार्वजनिक नळावर पाणी भरण्यासाठी गेली असताना अंकित नावाच्या नराधमाने तिला बंदुकीचा धाक दाखवून एका निर्जन स्थळी नेले आणि तेथे तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तरुणीने जवळच्याच कालव्यात उडी घेतली. पण लोकांनी तिला वाचविले.
व्हॅलेन्टाईन दिनी पत्नीची निर्घृण हत्या
हाथरस : उत्तर प्रदेशच्या हाथरस येथे व्हॅलेन्टाईन डे च्या दिवशी पत्नी परपुरुषासोबत आपत्तीजनक स्थितीत आढळल्याने संतप्त झालेल्या एका इसमाने आपल्या पत्नीला बेदम मारहाण करून तिची निघृर्ण हत्या केली. कृष्णा (२६) असे मृत महिलेचे नाव आहे. तिचा पती विक्रम सिंग याला ती दुसऱ्या पुरुषासोबत आपत्तीजनक स्थितीत सापडली. त्यामुळे विक्रमने पत्नीला तेथेच पकडले आणि बेदम मारहाण केली, ज्यात तिचा मृत्यू झाला.
मेरठ येथे पत्नीवर ॲसिड हल्ला
मेरठ : उत्तर प्रदेशच्या मेरठ येथे दुसऱ्या पुरुषासोबत अवैध संबंध असल्याच्या संशयावरून एका इसमाने आपल्या पत्नीच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकले. वकील असे ॲसिड हल्ला करणाऱ्या पतीचे नाव आहे. तो पेंटिंगचे काम करतो. पत्नीचे शेजारच्या इरफानशी संबंध असल्याचा त्याला संशय होता. यावरून त्याने पत्नीला फटकारले होते. परंतु तरीही ती इरफानला भेटत राहिली. यामुळे संतप्त झालेल्या वकीलने तिच्यावर ॲसिड फेकले.
कार-बस अपघातात चार जण ठार
कुरुक्षेत्र : कुरुक्षेत्र-पेहोवा मार्गावर रविवारी सकाळी एक कार आणि बस यांच्यात समोरासमोर टक्कर होऊन त्यात कारमधील चारजण जागीच ठार आणि एक जखमी झाला. मृतांत एका बालिकेचा समावेश आहे. लोकार माजरा गावाजवळ हा अपघात घडला.
उत्तर प्रदेशात दंगल एक जण ठार
आजमगड : उत्तर प्रदेशच्या आजमगड जिल्ह्याच्या हरिहरपूर गावात दोन गटांत उडालेल्या संघर्षात एक जण ठार आणि दोघे जखमी झाले. जमिनीच्या वादातून ही दंगल घडल्याचे पोलिसांनी सांगितले. दोन्ही गटांच्या लोकांनी परस्परांवर लाठ्या काठ्या आणि तलवारीने हल्ला केला. रामनाथ असे संघर्षात मारला गेलेल्या व्यक्तीचे नाव आहे.


Web Title: National: Important

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.