राष्ट्रीय महत्त्वाचे- आतील पान

By Admin | Updated: January 23, 2015 23:06 IST2015-01-23T23:06:14+5:302015-01-23T23:06:14+5:30

तीन मादकपदार्थ विक्रेत्यांना अटक

National importance- inner page | राष्ट्रीय महत्त्वाचे- आतील पान

राष्ट्रीय महत्त्वाचे- आतील पान

न मादकपदार्थ विक्रेत्यांना अटक
ठाणे-येथील गुन्हे शाखेतील मादक द्रव्य विरोधक शाखेचे प्रमुख एम.व्ही. धर्माधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार येथे मेफेड्रोन नावाचे मादक द्रव्य विकणाऱ्या तिघांना अटक करण्यात अली आहे. या तिघांनी आपला गुन्हा कबूल केला असून आपण कॉल सेंटर्समधील कर्मचाऱ्यांना हे पदार्थ विकत असल्याचे म्हटले आहे.
--------------------------
महिला चिकित्सकाला धमकी देणे महागात पडले
धौलपूर- केवळ टाईमपास करण्यासाठी एका महिला चिकित्सकला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोन आरोपींना गुरुवारी पोलिसांनी अटक केली.
येथील रुग्णालयातील डॉ. कल्पना मित्तल यांना मोबाईलवर धमकावणाऱ्या गुरू प्रधान व महेंद्र सिंग यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध चौकशी सुरू आहे.
-----------------------------
आसाम मंत्रिमंडळात फेरबदल
गुवाहाटी- आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी आपल्या साडेतीन वर्षांच्या मंत्रिमंडळात प्रथमच मोठा फेरबदल केला आहे. त्यात ११ नवे कॅबिनेट मंत्री व स्वतंत्र प्रभार असलेल्या तीन राज्यमंत्र्यांना सामील केले आहे.
राज्यपाल पद्मनाभ बालकृष्णन आचार्य यांनी राजभवनात या नव्या सदस्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.
---------------------------
महिला नक्षलवादी अटकेत
बालाघाट- पोलिसांनी कुख्यात नक्षलवादी महिला शकुंतला ऊर्फ शकुंता ऊर्फ थिंकी हिला अटक करण्यात यश मिळविले आहे. या महिलेवर १५ हजारांचे बक्षीस घोषित करण्यात आले होते. एका गुप्त सूचनेनुसार पोलिसांचे एक पथक पीपल गावात पोहचले. तेथे या महिलेला अटक करण्यात आली. पोलीस पुढील तपास करीत आहेत.
--------------------------
बुरखाधारी हल्लेखोरावर नागरिकांचा हल्ला
मुजफ्फरनगर-पंचायत प्रमुखांच्या वडिलांवर कथित रूपाने गोळीबार करणाऱ्या एका बुरखाधारी हल्लेखोरावर हल्ला करून नागरिकांनी त्याला ठार केल्याची घटना येथे घडली. रुपनपट्टी मथुरापूर येथे पंचायत प्रमुख मनोज याचे वडील राजेश्वर रजक यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. रजक यांची प्रकृती गंभीर आहे.
-----------------------
नेताजी सुभाषचंद्र बोस यांना राष्ट्रपतींची श्रद्धांजली
नवी दिल्ली-राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रपती भवनात नेताजी सुभाषचंद्र बोस यांना त्यांच्या ११८ व्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली अर्पण केली. याप्रसंगी राष्ट्रपती भवनातील अधिकारी व कर्मचारी वृंद उपस्थित होता.
-------------------------
पीकेविरुद्ध अलाहाबाद न्यायालयात खटला दाखल
अलाहाबाद-येथील एका स्थानिक न्यायालयात पीके या चित्रपटावर धार्मिक भावना दुखावल्याबद्दल खटला दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची सुनावणी २३ फेब्रुवारी रोजी केली जाणार आहे.
-------------------------
रस्ते अपघातात नऊ जण ठार
जयपूर-राजस्थानच्या राजसमंद जिल्ह्यातील देवगड ठाण्यात शुक्रवारी पहाटे झालेल्या ट्रोला व कारच्या धडकीत नऊ जण ठार झाले असून एक जण जखमी झाला आहे. पोलिसांनी ट्रोला चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे.
---------------------
राजधानीतील सरकारी कार्यालये २५ व २९ जानेवारीला बंद
नवी दिल्ली-गणराज्यदिनाच्या व्यवस्थेकरिता येथील नॉर्थ व साऊथ ब्लॉकमधील तसेच जवळच्या केंद्रीय कार्यालयातील कामकाज रविवार व गुरुवारी लवकर बंद केले जाईल. यात नॉर्थ ब्लॉक, साऊथ ब्लॉक, संसद भवन, रेल भवन, संचार भवन, कोटा हाऊस, जामनगर हाऊस, जनपथ भवन, भारतीय रिझर्व्ह बँक व विज्ञानभवनासह ७१ कार्यालये दुपारी १ पर्यंतच सुरू राहतील.
--------------------

Web Title: National importance- inner page

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.