राष्ट्रीय महत्त्वाचे-आतील पान
By Admin | Updated: January 29, 2015 23:17 IST2015-01-29T23:17:36+5:302015-01-29T23:17:36+5:30
गंगेच्या पुनउर्द्धाराकरिता जर्मन सरकारकडून २१ कोटी

राष्ट्रीय महत्त्वाचे-आतील पान
ग गेच्या पुनउर्द्धाराकरिता जर्मन सरकारकडून २१ कोटीनवी दिल्ली- गंगा नदीच्या पुनउर्द्धाराकरिता जर्मन सरकारने ३० लाख युरो (भारतीय चलनानुसार २१ कोटी) देण्याची तयारी दर्शिविली आहे. जर्मनीच्या पर्यावरण मंत्री बार्बरा हेड्रिक्स व केंद्रीय जलसंपदा मंत्री उमा भारती यांच्या दरम्यान झालेल्या बैठकीनंतर ही माहिती देण्यात आली. हा निधी मार्च महिन्यात देण्यात येण्याची शक्यता आहे.------------------------- मोदींच्या आश्वासन विफलतेकरिता काँग्रेसचे धरणेडेहराडून-परदेशात असलेला काळा पैसा १०० दिवसांच्या आत आणायचे आश्वासन पूर्ण करण्यात अपयशी ठरल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे समर्थक बाबा रामदेव यांच्याविरुद्ध उत्तराखंड प्रदेश काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हरिद्वार येथे धरणे आंदोलन केले.जिल्हाधिकाऱ्यांना सोपविलेल्या निवेदनात, दिलेली आश्वासने सरकारने पूर्ण करावीत व जनतेची माफी मागावी असे म्हटले आहे.---------------------------------नक्षल्यांची पत्रके आढळलीबालाघाट- येथील देवरबेली, सोनगुड्डा, मछूरदा या भागातील पोलीस चौक्यांच्या परिसरात नक्षल्यांची पत्रके आढळून आली आहेत. यात २६ जानेवारी हा दिवस काळा दिवस म्हणून साजरा करणे व सरकारच्या धोरणांना विरोध करण्याचे आवाहन करण्याचा मजकूर आहे. ही पत्रके गावांमधील भिंतींवर चिकटवण्यात आली आहेत. या भागात हाय अलर्ट लागू करण्यात आला आहे.---------------------------रेड्डी न्यायालयात हजरहैदराबाद-अवैध खाणप्रकरणी आरोपी असलेले कर्नाटकचे माजी मंत्री जी. जनार्दन रेड्डी व अन्य एका आरोपीने येथील विशेष सीबीआय न्यायालयात गुरुवारी हजेरी लावली. न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी १९ फेब्रुवारी रोजी निश्चित केली आहे. यानंतर रेड्डी व श्रीनिवास रेड्डी बेंगळुरूकडे रवाना झाले.------------------------------बांधकाम खचल्याने एक ठार, तीन जखमीनवी दिल्ली- येथील एका बांधकामाची माती खचल्याने झालेल्या अपघातात एक व्यक्ती ठार झाला तर तिघे जखमी झाल्याची घटना दक्षिण दिल्लीच्या किदवई नगरात घडली. येथील नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन लि.चे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी ही घटना गुरुवारी सकाळी ९.३०च्या सुमारास घडली. जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे.-------------------------दलितांवरील अत्याचारात वाढ-पुनियाकानपूर-विद्यमान सरकारच्या कार्यकाळात मागील सरकारच्या तुलनेत दलितांवरील अत्याचारात वाढ झाल्याचे मत राष्ट्रीय अनुसूचित आयोगाने व्यक्त केले आहे. आयोगाचे अध्यक्ष पी.एल. पुनिया यांनी सीमाक्षा बैठकीनंतर हे मत व्यक्त केले. यामागील कारण सांगताना त्यांनी, दलित जागरूक झाल्याने ते आता अत्याचाराची तक्रार करीत असल्याने ही वाढ दिसत असल्याचे म्हटले. --------------------------------संगीत नाटक अकादमीच्या प्रमुखपदी शेखर सेननवी दिल्ली-प्रसिद्ध संगीतकार व रंगमच दिग्दर्शक शेखर सेन यांची संगीत नाटक अकादमीच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. हे पद गेल्या चार महिन्यांपासून रिक्त होते. पद्मश्री व अन्य पुरस्काराने सन्मानित असलेले सेन या पदावर पाच वर्षे राहतील.-----------------------------जम्मू काश्मीर उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीशांची नियुक्तीनवी दिल्ली-जम्मू काश्मीर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी न्या. नारायणन नादर पॉल वसंतकुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत. न्या. वसंतकुमार हे सेवा, कायदा, श्रम कायदा व शिक्षणाशी संबंधित प्रकरणांचे तज्ज्ञ आहेत.