राष्ट्रीय महत्त्वाचे

By Admin | Updated: April 13, 2015 23:53 IST2015-04-13T23:53:10+5:302015-04-13T23:53:10+5:30

राष्ट्रीय-महत्त्वाचे

National importance | राष्ट्रीय महत्त्वाचे

राष्ट्रीय महत्त्वाचे

ष्ट्रीय-महत्त्वाचे
आसाममध्ये बॉम्बस्फोट
एक ठार, तीन जखमी
गुवाहाटी : आसामच्या उदालपुरी जिल्ह्यात रविवारी सकाळी एका हातबॉम्बचा स्फोट होऊन त्यात एक जण ठार आणि तीन जखमी झाले. भंगार व्यावसायिकाने भंगाराच्या ढिगाऱ्याला आग लावली त्यावेळी त्यात पडलेल्या या हातबॉम्बचा स्फोट झाला. या व्यावसायिकाने विकत घेतलेल्या भंगारामध्येच हा हातबॉम्ब असावा असा पोलिसांचा कयास आहे. स्फोटात या व्यक्तीच्या देहाच्या चिंधड्या उडाल्या.
पिकांचे नुकसान झाल्याने
तीन शेतकऱ्यांची आत्महत्या
मुजफ्फरनगर : उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगर जिल्ह्यात पडलेला अवकाळीपाऊस आणि वादळामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसात पिके बुडाल्यामुळे या जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. दुर्गंधपूर येथे सुखबीर (५७), सिकरी येथे राशीद खान (६०) आणि मोहदपूर येथे (खेमचंद (७५) या तीन शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविली.
पंजाबात शिवसेना
नेत्यावर गोळीबार
गुरुदासपूर : पंजाबच्या गुरुदासपूर येथे रविवारी शिवसेना नेते हरविंदर सोनी यांच्यावर हल्लेखोरांनी गोळीबार केला. यात सोनी गंभीर जखमी झाले आहेत. सोनी हे सकाळी फशि पार्क उद्यानात फिरायला गेले असताना त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. सोनी यांच्या सुरक्षा गार्डने काश्मिरा सिंग या हल्लेखोराला पकडले. स्वतंत्र शीख राष्ट्राच्या समर्थनार्थ घोषणा देत या हल्लेखोराने सोनी यांच्यावर गोळीबार केल्याचे समजते.
रस्ता अपघातात
पिता-पुत्रीचा मृत्यू
जयपूर : राजस्थानच्या जयपूर-अगमेर महामार्गावरील भानक्रोता येथे रविवारी सकाळी एका दुचाकीला भरधाव ट्रकने धडक दिल्याने दुचाकीवरील पिता-पुत्रीचा करुण अंत झाला. तर मृत व्यक्तीची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. हे तिघेही दुचाकीने नरसिंगपुरा या आपल्या गावावरून लग्न समारंभासाठी जयपूरला येत असताना हा अपघात घडला.
मणिपुरात बॉम्बस्फोट, चार जखमी
इम्फाळ : मणिपूरच्या चुराचांदूर जिल्ह्यात सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना लक्ष्य बनवून करण्यात आलेल्या बॉम्बहल्ल्यात चारजण जखमी झाले. जेथे हा हल्ला झाला तो भाग म्यानमारच्या सीमेवर आहे. हा बॉम्ब रस्त्याच्या कडेला पेरून ठेवण्यात आला होता. सीमा सुरक्षा दलाचे जवान येण्यापूर्वीच त्याचा स्फोट झाला. अद्याप कोणत्याही बंडखोर संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
बिहारमध्ये ३२ किलोचरस जप्त
पाटणा : बिहारच्या पश्चिम चंपारण जिल्ह्यातील पुरानिया गावाजवळ शनिवारी रात्री महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी ३२ किलो चरस हा मादक पदार्थ जप्त केला. नेपाळमधून तस्करीच्या मार्गाने चरस भारतात आणण्यात येत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. २८ पाकिटांमध्ये हे चरस ठेवण्यात आले होते. तथापि तस्करांना पकडण्यात अधिकाऱ्यांना अपयश आले.

Web Title: National importance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.