शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

"मोतीलाल व्होरा नॅशनल हेराल्ड आणि यंग इंडियनचे काम पाहायचे", राहुल गांधीचे EDला उत्तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 13:08 IST

National Herald: अंमलबजावणी संचालनालय गेल्या तीन दिवसांपासून काँग्रेस नेते राहुल गांधी यांची चौकशी करत आहे. या चौकशीत तपास अधिकारी अनेक प्रश्नांची उत्तरे शोधत आहेत.

नवी दिल्ली:अंमलबजावणी संचालनालय (ED) गेल्या तीन दिवसांपासून काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची चौकशी करत आहे. राहुल गांधी यांच्या अनेक तासांच्या चौकशीत तपास अधिकारी अनेक प्रश्नांची उत्तरे शोधत आहेत. ईडीचा सर्वात मोठा प्रश्न नॅशनल हेराल्ड आणि मनी लाँडरिंग प्रकरणाशी संबंधित आहे. हे प्रकरण 2010 मध्ये स्थापन झालेल्या गांधी कुटुंबाच्या मालकीच्या यंग इंडियन लिमिटेड या कंपनीशी संबंधित आहे. ज्याची सुरुवात फक्त 5 लाख रुपयांच्या भांडवलाने झाली होती. पण तपास यंत्रणेच्या म्हणण्यानुसार आज त्यांच्याकडे सुमारे 800 कोटी रुपयांची संपत्ती आहे. ही मोठी संपत्ती कशी निर्माण झाली?

राहुल गांधींची भूमिका काय?राहुल गांधींच्या चौकशीदरम्यान, ईडीच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणी विचारले की, यंग इंडियन लिमिटेड कंपनीच्या मालमत्तेत वाढ एका डीलमुळे झाली. नॅशनल हेराल्ड प्रकाशित करणारी कंपनी असोसिएटेड जनरल लिमिटेडच्या अधिग्रहणामुळे हा करार झाला. त्यावेळी राहुल गांधींची भूमिका काय होती? या प्रश्नाच्या उत्तरादरम्यान राहुल गांधी म्हणाले की, मोतीलाल व्होरा यंग इंडियन लिमिटेडचे ​​सर्व काम पाहत असत. त्याबाबत राहुल गांधींकडे कोणतीही माहिती नाही किंवा राहुल गांधी कोणत्याही बैठकीला गेले नाहीत. यंग इंडियन लिमिटेडपासून नॅशनल हेराल्डपर्यंत मोतीलाल व्होरा यांचे नियंत्रण होते. कंपनीशी संबंधित प्रत्येक व्यवहार त्यांच्या मार्गदर्शनाखाली व देखरेखीखाली होत असे.

राहुल गांधींना काय फायदा?या प्रकरणी ईडीच्या पथकाने मोतीलाल व्होरा, मल्लिकार्जुन खर्गे, पवन बन्सल आदींची यापूर्वीच चौकशी केली आहे. या वर्षी एप्रिल महिन्यात तपास यंत्रणेने चौकशी केली असता, चौकशीदरम्यान अनेक माहिती मिळाली. त्यानंतर तपासाची व्याप्ती राहुल गांधी आणि सोनिया गांधींपर्यंत वाढली होती. मोतीलाल व्होरा आणि ऑस्कर फर्नांडिस या कंपनीचे प्रमुख भागधारक त्यांच्या मृत्यूनंतर आता एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे की, या दोघांच्या मृत्यूनंतर राहुल गांधींना याचा काय फायदा होईल? कारण हे दोघेही या प्रकरणातील सर्वात मोठी नावे होती. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय