शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 20:43 IST

नॅशनल हेराल्ड प्रकरणात गांधी कुटुंबाविरुद्ध सत्तेचा गैरवापर होत असल्याचे पी चिदंबरम यांनी म्हटले.

P. Chidambaram on ED Action: नॅशनल हेराल्डशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केल्यानंतर काँग्रेसमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ईडीने राऊस अव्हेन्यू कोर्टात हे आरोपपत्र दाखल केले असून २५ एप्रिल रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. या कारवाईविरोधात काँग्रेसने देशभरात ईडीच्या विरोधात आंदोलन देखील केले होते. त्यानंतर आता माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदम्बरम यांनी टीका केली आहे. या प्रकरणात मनी लाँड्रिंगचा खटला कुठे आहे? असा सवाल पी. चिदम्बरम यांनी केला आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी नॅशनल हेराल्ड प्रकरणातील आरोपपत्र हे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या प्रामाणिकपणा आणि प्रतिष्ठेला कलंकित करण्याच्या उद्देशाने दाखल करण्यात आल्याचे म्हटलं आहे. पी. चिदम्बरम यांनी नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीच्या तपासावर प्रश्न उपस्थित केले आहेत. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा बचाव करताना चिदम्बरम यांनी ईडीला या प्रकरणात चौकशी करण्याचा अधिकार नसल्याचा दावा केला आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचे मनी ट्रेल नसल्याचे पी. चिदम्बरम यांनी म्हटलं.

पी. चिदम्बरम यांनी पत्रकार परिषद घेत नॅशनल हेराल्ड प्रकरणावरुन ईडीच्या कारवाईवरुन ताशेरे ओढले."नॅशनल हेराल्ड प्रकरणात, यंग इंडिया आणि असोसिएट जनरलने कोणत्याही शेअरहोल्डर किंवा इतर कोणत्याही व्यक्तीला एक पैसाही दिला नाही. ईडीने कुठूनही एक पैसाही जप्त केला नाही, मग हा मनी लाँड्रिंगचा खटला कसा असू शकतो? राजकीय द्वेषामुळे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ईडीकडून त्रास दिला जातोय. जोपर्यंत कुठूनही पैशाचा व्यवहार झाल्याचे किंवा कोणताही चुकीचा व्यवहार झाल्याचे आढळत नाही, तोपर्यंत मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल करण्याचा प्रश्नच येत नाही," असे पी. चिदम्बरम म्हणाले.

"पैशाचा व्यवहार होत नाही तोपर्यंत गुन्हेगारी कृत्य होत नाही ही साधी गोष्ट आहे.  गुन्ह्यातून मिळालेल्या उत्पन्नाशिवाय मनी लाँडरिंगही होत नाही. त्यामुळे मनी लाँडरिंगशिवाय ईडीला गुन्हा नोंदवण्याचा अधिकार नाही. त्यामुळे या प्रकरणावरुन स्पष्ट होतंय की, ईडी, त्यांच्या राजकीय मालकांच्या इशाऱ्यावर काँग्रेसच्या नेत्यांविरुद्ध सूडबुद्धीने वागत आहे. यात गुन्हा कुठे आहे? गुन्ह्यातून मिळणारे उत्पन्न कुठे आहे? कुठे आहे तो  पैसा? मनी लाँड्रिंगचा गुन्हा कुठे आहे?," असाही सवाल पी. चिदम्बरम यांनी केला.

टॅग्स :P. Chidambaramपी. चिदंबरमSonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधीEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय