नॅशनल हेराल्ड केस - सोनिया व राहुल गांधींना न्यायालयाचे समन्स
By Admin | Updated: June 26, 2014 18:52 IST2014-06-26T16:29:53+5:302014-06-26T18:52:30+5:30
नॅशनल हेराल्ड केस प्रकरणी दिल्लीतील पटियाला कोर्टाने सोनिया गांधी व राहुल गांधीना समन्स बजावले असून त्यांना ७ ऑगस्ट रोजी होणा-या सुनावणीसाठी उपस्थित राहण्याचा आदेश देण्यात आला आहे.

नॅशनल हेराल्ड केस - सोनिया व राहुल गांधींना न्यायालयाचे समन्स
ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. २६ - नॅशनल हेराल्ड केस प्रकरणी दिल्लीतील पटियाला कोर्टाने सोनिया गांधी व राहुल गांधींना समन्स बजावले आहेत. ७ ऑगस्ट रोजी होणा-या सुनावणीसाठी उपस्थित राहण्याचा आदेश न्यायालयाने त्यांना दिला आहे. न्यायालयाने याप्रकरणी काँग्रेस नेते ऑस्कर फर्नांडिस व मोतीलाला व्होरा यांनाही समन्स बजावले आहे.
सुब्रमण्यम स्वामी यांनी याप्रकरणी न्यायालयात याचिका दाखल केली होती. या वृत्तपत्राच्या २,००० कोटींच्या निधीचा गैरवापर केल्याचा आरोप स्वामी यांनी केला आहे. नॅशनल हेराल्ड हे वृत्तपत्र १९३८ साली भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी सुरू केले होते. मात्र २00८ मध्ये हे वृत्तपत्र बंद करण्यात आले.