नॅशनल हेराल्ड प्रकरण हा १०० टक्के राजकीय सूड - राहूल गांधी
By Admin | Updated: December 9, 2015 15:00 IST2015-12-09T14:59:55+5:302015-12-09T15:00:38+5:30
नॅशनल हेराल्ड खटला हा १०० टक्के पंतप्रधान घेत असलेला राजकीय सूड असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधी यांनी व्यक्त केली आहे

नॅशनल हेराल्ड प्रकरण हा १०० टक्के राजकीय सूड - राहूल गांधी
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ९ - नॅशनल हेराल्ड खटला हा १०० टक्के पंतप्रधान घेत असलेला राजकीय सूड असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधी यांनी व्यक्त केली आहे. अर्थात, न्यायालयीन व्यवस्थेवर आपला संपूर्ण विश्वास असल्याचेही गांधी म्हणाले. मात्र, न्यायालयीन व्यवस्थेवर दबाव आणण्यासाठी काँग्रेस संसदीय कामकाजाचा गैरवापर करत असल्याच्या आरोपाचा मात्र त्यांनी इन्कार केला आहे.
हा १०० टक्के राजकीय सूड आहे, या शब्दात त्यांनी नॅशनल हेराल्ड खटल्याचे - ज्यामध्ये सोनिया गांधी व राहूल गांधी यांना १९ डिसेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे - वर्णन केले आहे. संसदेबाहेर पत्रकारांशी ते बोलत होते.
सगळ्यात शेवटी न्यायाचा विजय होईल आणि सत्य समोर येईल असेही त्यांनी सांगितले.
काँग्रेसच्या खासदारांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज मंगळवारी बंद पाडले व बुधवारीही सकाळच्या सत्रात जोरदार घोषणाबाजी करत काम होऊ दिले नाही.