शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

काश्मीरमध्ये Editor-in-Chief निघाला दहशतवादी, न्यूज पोर्टलचा संपादक चकमकीत ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 13:36 IST

Editor in Chief be a terrorist in Kashmir: पत्रकारितेच्या नावाखाली दहशतवादी संघटनेसाठी काम करणाऱ्या एका संपादकाचा सुरक्षा दलांनी एन्काऊंटर केला आहे.

Editor in Chief be a terrorist in Kashmir: पत्रकारितेच्या नावाखाली दहशतवादी संघटनेसाठी काम करणाऱ्या एका संपादकाचा सुरक्षा दलांनी एन्काऊंटर केला आहे. जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरमध्ये मंगळवारी मध्यरात्री सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तैयबाच्या दोन दहशतवाद्यांना चकमकीत ठार केलं. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दहशतवाद्यांपैकी एक रईस अहमद भट पूर्वी पत्रकारिता करत होता आणि अनंतनागमधील 'व्हॅली न्यूज सर्व्हिस'चे ऑनलाइन पोर्टल चालवत होता. दहशतवादी घटनांशी संबंधित अहमद भटवर यापूर्वीच दोन एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. काश्मीर झोन पोलिसांनी रईसचे प्रेस ओळखपत्र जारी केले आहे. हिलाल अह राहा असे ठार झालेल्या दुसऱ्या दहशतवाद्याचे नाव असून तो बिजबेहारा येथील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. तो 'सी' कॅटेगरीचा दहशतवादी होता.

खोऱ्यात लपून बसलेत दहशतवादीश्रीनगरच्या रैनावरी भागात ही चकमक झाल्याची माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिली आहे. येथे काही दहशतवादी लपले आहेत. ते काहीतरी प्लान करण्याच्या प्रयत्नात आहेत अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला. काश्मीर झोनचे आयजीपी विजय कुमार यांनी सांगितले की, ठार झालेले दोन्ही दहशतवादी अनेक घटनांमध्ये सामील होते. त्यांनी अनेक निष्पाप नागरिकांची हत्याही केली होती. 

चकमकीच्या ठिकाणी सापडली अनेक आक्षेपार्ह कागदपत्रं चकमकीनंतर सुरक्षा दलांना घटनास्थळावरून दारुगोळ्यासह आक्षेपार्ह कागदपत्रं सापडली आहेत. भट हा दहशतवादी संघटना लष्करशी संबंधित होता. माध्यमांच्या ओळखपत्राचा तो गैरवापर करायचा. सुरक्षा दलाच्या यादीत भटला दहशतवाद्यांच्या 'सी' श्रेणीत ठेवण्यात आले होते. ही चकमक घाटी पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) यांच्या संयुक्त मोहिमेचा भाग होती.

रईस गेल्या वर्षीच दहशतवादी बनला होतारईस गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये दहशतवादी संघटनेत सामील झाला होता आणि आता तो एका चकमकीत मारला गेला आहे. याच महिन्यात काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी ९ विविध चकमकीत १३ दहशतवाद्यांचा खात्मा केला असून २ दहशतवाद्यांना जिवंत पकडलं आहे. याआधी सोमवारी जम्मूच्या बडगाम परिसरातून लष्कर-ए-तैयबा (LeT) या दहशतवादी संघटनेशी संबंधित दोन सक्रिय दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं होतं. बडगाम पोलीस आणि राष्ट्रीय रायफल्स ऑपरेशन (RR) च्या ६२ व्या बटालियनने ही कारवाई केली. शोपियान परिसरातून पकडलेल्या या दोन दहशतवाद्यांची ओळख वसीम अहमद गनई आणि इक्बाल अशरफ शेख अशी करण्यात आली असून त्यांच्याकडून गुन्हेगारी साहित्य, शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा, एक चिनी पिस्तूल, दोन पिस्तूल मॅगझिन, १२ पिस्तूल राऊंड, ३२ एके-४७ राऊंड जप्त करण्यात आले आहेत.

टॅग्स :terroristदहशतवादीTerror Attackदहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीर