लोकनेता जनरल आवारी मंचतर्फे राष्ट्रीय चेतना उत्सव

By Admin | Updated: August 8, 2015 00:23 IST2015-08-08T00:23:45+5:302015-08-08T00:23:45+5:30

नागपूर : लोकनेता जनरल मंचरशा आवारी विचारमंचतर्फे क्रांतिदिनपासून स्वातंत्र्यदिनापर्यंत राष्ट्रीय चेतना उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. युवकांमध्ये देशभक्तीची भावना रुजावी, स्वातंत्र्य चळवळीतील स्वातंत्र्य संग्राम सैनिकांचे स्मरण व्हावे, हा उत्सवामागचा उद्देश आहे. यानिमित्त ९ ऑगस्टला क्रांतिदिनी शहीद शंकर महल्ले यांच्या स्मारकाला माल्यार्पण करण्यात येणार आहे. ११ ऑगस्टला स्वातंत्र्यासाठी तुरुंगवास भोगलेल्या दलेर बानो मंचरशा अवारी यांच्या १०३ व्या जयंतीनिमित्ताने होम फॉर एजेड ॲण्ड हॅण्डीकॅप संस्था येथील अनाथ अपंग विद्यार्थ्यांना वॉकर व शालेय साहित्याचे वितरण करण्यात येणार आहे. १४ ऑगस्टला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या सेवाग्राम येथील आश्रमाला व बापू कुटीला अभिवादन करण्यात येणार आहे. १५ ऑगस्टला भारताचा ६८ वा स्वातंत्र्य दिनानिमित्त झेंडावंदन कार्यक्रम होणार अस

National Consciousness Celebration by Loknata General Awari Forum | लोकनेता जनरल आवारी मंचतर्फे राष्ट्रीय चेतना उत्सव

लोकनेता जनरल आवारी मंचतर्फे राष्ट्रीय चेतना उत्सव

गपूर : लोकनेता जनरल मंचरशा आवारी विचारमंचतर्फे क्रांतिदिनपासून स्वातंत्र्यदिनापर्यंत राष्ट्रीय चेतना उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. युवकांमध्ये देशभक्तीची भावना रुजावी, स्वातंत्र्य चळवळीतील स्वातंत्र्य संग्राम सैनिकांचे स्मरण व्हावे, हा उत्सवामागचा उद्देश आहे. यानिमित्त ९ ऑगस्टला क्रांतिदिनी शहीद शंकर महल्ले यांच्या स्मारकाला माल्यार्पण करण्यात येणार आहे. ११ ऑगस्टला स्वातंत्र्यासाठी तुरुंगवास भोगलेल्या दलेर बानो मंचरशा अवारी यांच्या १०३ व्या जयंतीनिमित्ताने होम फॉर एजेड ॲण्ड हॅण्डीकॅप संस्था येथील अनाथ अपंग विद्यार्थ्यांना वॉकर व शालेय साहित्याचे वितरण करण्यात येणार आहे. १४ ऑगस्टला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या सेवाग्राम येथील आश्रमाला व बापू कुटीला अभिवादन करण्यात येणार आहे. १५ ऑगस्टला भारताचा ६८ वा स्वातंत्र्य दिनानिमित्त झेंडावंदन कार्यक्रम होणार असल्याची माहिती आवारी विचार मंचचे मार्गदर्शक गेव्ह आवारी यांनी पत्रपरिषदेत दिली. यावेळी संयोजक रमेश गिरडकर, डॉ. महादेव नगराळे, सुभाष मासूरकर, सुधाकर गेडाम, सारंग गौर, श्याम हटवार आदी उपस्थित होते.

Web Title: National Consciousness Celebration by Loknata General Awari Forum