शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

'...तर जम्मू-काश्मीरमध्ये कुठेही तिरंगा दिसणार नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2018 15:24 IST

नॅशनल कॉन्फरन्सच्या आमदाराचं वादग्रस्त विधान

श्रीनगर: जम्मू-काश्मीरमध्ये लागू असलेलं कलम 370 रद्द करण्याचा प्रयत्न केल्यास राज्यात कुठेही तिरंगा दिसणार नाही, असं वादग्रस्त विधान नॅशनल कॉन्फरन्सचे आमदार जावेद अहमद राणा यांनी केलं आहे. राज्यातील 35ए आणि कलम 370 हटवण्याचा प्रयत्न केल्यास जम्मू-काश्मीरमध्ये तिरंगा फडकताना दिसणार नाही, असं राणा म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. जम्मू-काश्मीरात लागू असलेलं कलम 370 रद्द करु, असं नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी अनेकदा म्हटलं होतं. तोच संदर्भ देत जावेद राणा यांनी जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवू नका, असा इशारा दिला. 'कलम 370 रद्द करण्याचा प्रयत्न केल्यास राज्यात कुठेही तिरंगा दिसणार नाही,' असं राणा म्हणाले. नेका विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करणारे राणा मेंढरमधील छूंगा गावातील एका जनसभेला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी उपस्थितांना कलम 370 च्या रक्षणासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन केलं. 

कलम 370 संपुष्टात आल्यास दुसऱ्या राज्यांमधील लोक जम्मू-काश्मीरमध्ये येतील आणि इथलं सगळं काही खरेदी करतील, असं राणा यांनी म्हटलं. कलम 370 लागू असल्यामुळे आज अनेकांना नोकऱ्या मिळत आहेत. मात्र हे कलम रद्द केल्यास सर्व काही संपून जाईल. तुमचं भविष्य धोक्यात येईल, असं जावेद राणा म्हणाले. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा